केळझरजवळ रानडुक्करआडवे आल्याने कारला अपघात

चार जण जखमी

    दिनांक :13-Apr-2026
Total Views |
सेलू
Car accident Keljar नागपूरकडून वर्धेकडे येणार्‍या कारसमोर अचानक रानडुक्कर े आल्याने कार दुभाजकावर आदळून अपघात झाला. यात चार जण जखमी झाले. ही घटना आज सोमवार १३ रोजी मध्यरात्री केळझर येथील सामाजिक वनीकरण रोपवाटिकेजवळ घडली.
kelzar 
 
Car accident Keljar मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ३२ वाय ४२४२ क्रमांकाची कार नागपूरहून वर्धेकडे येत असताना केळझर परिसरात रानडुक्कर आडवे आले. त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून कार दुभाजकावर चढली व विरुद्ध दिशेला गेली. त्याच वेळी नागपूरकडे जाणार्‍या एम.एच. ४० सी.डी. ५२६४ क्रमांकाच्या ट्रकच्या हेडलाईटला धडक बसून कार उलटली झाली.
Car accident Keljar या अपघातात चालक इलाही खान (रा. पुलफैल, वर्धा) यांच्यासह तमन्ना योगेश विश्वकर्मा (२७) रा. समतानगर, कोमल धानोरकर (२९) रा वर्धा आणि अल्फिया प्रणय फुलझेले (२१) रा. वरूड अशी जखमींची नावं आहेत. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना कारमधून बाहेर काढले. काही काळ वाहतुकीचा खोळंबाही झाला होता. दरम्यान, रुग्णमित्र प्रज्वल लटारे यांनी तत्परता दाखवत जखमींना रुग्णवाहिकेद्वारे सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
Car accident Keljar घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.