सिंदेवाही,
tiger attack मोहफुल गोळा करण्यासाठी शेतात गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून तिला ठार केले. ही घटना तालुक्यातील गुंजेवाही येथे सोमवार, 13 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजताच्या सुमारास घडली. वच्छला ईश्वर वाडगुरे (63, रा. गुंजेवाही) असे मृतक महिलेचे नाव आहे.

गुंजेवाही येथील 3 महिला आणि 1 पुरुष सोमवारी सकाळच्या सुमारास जंगलालगत असलेल्या शेतात मोहफुल वेचण्याकरिता गेले होते. मोहफुल वेचत असताना वाघाने अचानक वच्छला वर हल्ला केला. सोबतच्या तिघांनी आरडाओरड केली. मात्र, वाघाने महिलेला जबड्यात पकडून जंगलाच्या दिशेने ओढत नेले. हे द़ृष्य अनेक नागरिकांनी बघितले. त्यांनी आरडाओरड करून वाघाला हुसकावण्याचा प्रयत्न केला. एका दुचाकीस्वाराने गावात पोहचून गावकर्यांना माहिती दिली. काही वेळाने गावकरी मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. शोधाशोध केल्यावर महिलेचा छन्नविच्छिन्न अवस्थेत मृतदेह आढळला. घटनेची माहिती कळताच पोलिस व वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.tiger attack वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली बोरावार यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करण्यात आला. मृतदेह ताब्यात घेऊन विच्छेदनासाठी सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असून, वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी गावकर्यांनी केली आहे.