यवतमाळात 3.60 लाखांचे प्रतिबंधित कापूस बियाणे जप्त

20 लाखांचा मुद्देमाल जप्त

    दिनांक :13-Apr-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,

cotton seeds जिल्ह्यात अवैध बियाणे विक्री आणि वाहतुकीविरोधात कृषी विभाग व पोलिस प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. भारत सरकारने प्रतिबंधित केलेल्या अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाण्यांची चोरटी वाहतूक करणाèया टोळीचा पर्दाफाश करत प्रशासनाने सुमारे 20 लाख 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
 
 
cotton seeds
यवतमाळ शहरात एका ‘किया सोनेट’ (जीजे 09-5486) आणि अन्य एका चारचाकी वाहनातून प्रतिबंधित बियाण्यांची तस्करी होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीच्या आधारे कृषी विभाग आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तरित्या सापळा रचून ही वाहने अडवली.
 
 
वाहनाची झडती घेतली असता यात मोठ्या प्रमाणात अवैध साठा मिळून आला. यात ‘प्लॅटिनम 5जी’ नावाच्या प्रतिबंधित कापूस बियाण्यांची 400 पाकिटे असून या जप्त केलेल्या बियाण्यांची किंमत 3.60 लाख रुपये आहे. 2 चारचाकी वाहने आणि 3 मोबाईल फोन (किंमत 16.40 लाख रुपये) असा एकूण 20 लाख 400 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.
या प्रकरणी कृषी cotton seeds  अधिकारी (गुणवत्ता नियंत्रण) प्रेमनाथ आडे यांच्या तक्रारीवरून यवतमाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेत असलेल्या आरोपींमध्ये संतोष ठाकरे (चांदूर रेल्वे), निखिल लंगडे (आर्वी), सतीश ठाकरे (अमरावती) यांचा समावेश आहे.आरोपींविरुद्ध बियाणे कायदा 1966, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986, कापूस बियाणे अधिनियम 2009 आणि अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 च्या विविध कलमान्वये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.ही कारवाई निविठा व गुणनियंत्रक संचालक सुनील बोरकर, विभागीय कृषी सहसंचालक गणेश घोरपडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज ढगे आणि कृषी विकास अधिकारी लहुदास आडे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक धीरज मोहेकर व प्रवीण जाधव यांनी पार पाडली.