तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
Yavatmal police promotions पोलिस महासंचालकांच्या पत्रानुसार, यवतमाळात कार्यरत 21 सहायक पोलिस उपनिरीक्षकांना पोलिस उपनिरीक्षक म्हणून जिल्ह्यातील विविध विभागांत पदोन्नती देण्यात आली आहे.
हा आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी सोमवार, 13 एप्रिल रोजी जारी केला. या आदेशानुसार विभागीय अर्हता परीक्षा 2013 मधील उत्तीर्ण पोलिसांना पोलिस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. त्यानुसार गजानन किनाके यांची बिटरगाव येथे नेमणूक करण्यात आली आहे.
महेश पुनसे (नेर), रवींद्र जाधव (आर्णी), अरुण भोयर (शिरपूर), वसंत कांबळे(यवतमाळ शहर), श्याम पांढरकर (लोहारा), गजानन कोरडे(उपविपोअ-यवतमाळ), प्रकाश आडे (नेर), अनिल देशभ्रतार (यवतमाळ शहर), बापुराव दोडके (उपविपोअ दारव्हा), पुरुषोत्तम सोडगीर(अवधूतवाडी), देविदास वाघमारे (उमरखेड), आनंद चंदेवाड(वसंतनगर), दीपक आस्कर (बाभुळगाव), सुभाष ठाकरे (नेर), योगेश गटलेवार(पोलिस नियंत्रण कक्ष), गणेश खंडाते(उपविपोअ-यवतमाळ), सय्यद साजीद (वणी), गणेश हुलके(अवधूतवाडी), प्रमोद घोटेकर (पांढरकवडा) आणि गणेश घोसे (यवतमाळ ग्रामीण) यांना पदोन्नती देण्यात आली आहे.