अनिल कांबळे
नागपूर,
young man commits suicide सिताबर्डी परिसरातील एका हाॅटेलमध्ये 27 वर्षीय तरुणाने गळास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समाेर आली आहे. ही घटना सुमारे 48 तासांनंतर उघडकीस आली असून प्रेमभंगातून त्याने हे टाेकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे. मृत तरुणाची ओळख तनूज काेरे (रा. भंडारा) अशी झाली आहे. ताे 8 एप्रिलपासून सिताबर्डीतील पकाेडेवाला गल्लीतील एका हाॅटेलमध्ये राहत हाेता. मागील दाेन दिवसांपासून ताे बाहेर न दिसल्याने संशय निर्माण झाला. शेवटचा ताे पाण्याची बाटली घेऊन खाेलीत जाताना दिसला हाेता.
दरम्यान, त्याने खाेलीचे दार उघडले नाही आणि माेबाईल काॅलसुद्धा उचलत नव्हता. त्यामुळे हाॅटेल कर्मचाèयांनी दाेन साक्षीदारांच्या उपस्थितीत दार ताेडून आत प्रवेश केला. तनूज काेरे हा छताच्या पंख्याला कापडाच्या सहाय्याने गळास घेतलेल्या अवस्थेत आढळला. त्याला तात्काळ खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले, मात्र डाॅक्टरांनी त्याला मृत घाेषित केले. सिताबर्डी पाेलिसांनी तक्रारीच्या आधारे आकस्मिक मृत्यूची नाेंद केली. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला आहे.young man commits suicide तनूजने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याची माहिती समाेर आली आहे. त्याचे एका तरुणीवर प्रेम होते. मात्र, तिने लग्नास नकार दिल्यामुळे तनुज नैराश्यात गेला होता. त्यानंतर त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले.