आमदारासह भाजपा पदाधिकारी पोलिस ठाण्यात
सखोल चौकशीची केली मागणी
अमरावती,
परतवाडा येथील अनेक मुलींचे Sexual abuse cases लैंगिक शोषण प्रकरणी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी व अचलपूरचे आ. प्रवीण तायडे यांनी प्रमुख भाजपा पदाधिकार्यांसोबत मंगळवारी परतवाडा येथे पोलिस निरीक्षक मस्के यांची भेट घेतली. सोमवारी परतवाडा येथील गंभीर प्रकरणावर शिवराय कुळकर्णी, खासदार डॉ. अनिल बोंडे आणि आ. प्रवीण तायडे यांनी आवाज उचलल्यानंतर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन अमरावती जिल्हा पोलिस अधीक्षकांना कुठलीही हयगय न करता कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. रात्रीच परतवाडा पोलिसांनी अयान अहमद तनवीर अहमद या मुख्य आरोपीच्या विरोधात पोक्सोसहित सर्व गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून त्यास अटक केली.
अय्यान अहमदशिवाय आणखी १० ते १२ जण या रॅकेटमध्ये सामील असून त्यांनाही पोलिसांनी तात्काळ शोधले पाहिजे. यातील काही संशयित आरोपींचे राजकीय नेत्यांशी नातेसंबंध आहेत. मुख्य आरोपी तर एआयएमआयएम पक्षाचा पदाधिकारी आहे. हे सर्व संबंध पोलिसांनी तपासले पाहिजे. हे अश्लाघ्य कृत्य ज्या ज्या हॉटेल मध्ये झाले, त्या हॉटेलांवरही कारवाई झाली पाहिजे. अय्यान अहमदसारख्या नाराधमाचे अतिक्रमणात बांधलेले घर बुलडोझर लावून पाडले पाहिजे. या नराधमांना सुखाने जगू देण्याचे कारणच नाही. १५० हून अधिक युवतींचे आयुष्य उद्ध्वस्त करणार्या या प्रकरणात धडाकून कारवाई करण्याची विनंती भाजपा पदाधिकारंनी पोलिस निरीक्षकांकडे केली.
पीडितांना तक्रारीसाठी केले प्रोत्साहित
Sexual abuse cases मंगळवारी सकाळपासून अचलपूरचे भाजपा आ. प्रवीण तायडे आणि भाजपा प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी काही पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. कुठल्याही प्रकारचे मानसिक दडपण येऊ न देता आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी निर्भयपणे पोलिसांकडे तक्रार नोंदवली पाहिजे, अशी पीडित तरुणींची समजूत घातली. अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील या प्रकरणाची दखल घेत अमरावतीच्या पोलिस अधीक्षकांशी तात्काळ संपर्क साधला. या प्रकरणी कठोर कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी देखील दिले आहेत.