आजनसरा,
Nitin Gadkari श्रीक्षेत्र आजनसरा येथे संत भोजाजी महाराजांचा पुण्यतिथी सोहळा सुरू असून या वर्षीची महापूजा केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते व्हावी यासाठी देवस्थानचे अध्यक्ष डॉ. विजय पर्बत व विश्वस्त मंडळाने ना. गडकरी यांना निमंत्रीत केले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते संत भोजाजी महाराजांची महापूजा करण्यात आली. यावेळी आजनसरा येथे स्व. दत्ताजी मेघे स्मृती अन्नछत्र व धर्मशाळा उभारणार असल्याची माहिती ना. गडकरी यांनी दिली.
कार्यक्रमाच्या सुरवातीला स्व. दत्ताजी मेघे व स्व. रामदास आंबटकर यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी ना. गडकरी यांच्या हस्ते विशेष सामाजिक कार्य करणारे जेष्ठ नागरिक रामदास ईखार, वसंत कोसूरकर, शरद निंबाळकर यांचा सत्कार करण्यात आला, तसेच आर्थिक दृष्ट्या मागास असलेले विद्यार्थी चंदन थुल व ख़ुशी जोगी यांना देवस्थानकडून देण्यात येणार्या शैक्षणिक मदतीचा धनादेश ना. गडकरी यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी दिवंगत लोकनेते दत्ताजी मेघे यांच्या स्मृती प्रित्यर्थ अन्नछत्र व या Nitin Gadkari स्थळी दर्शनाला येणार्या जेष्ठ नागरिकांसाठी सुविधा पूरक अद्यावत भक्तनिवास उभारण्याचा संकल्प जाहीर केला. त्यासाठी मेघे परिवारातील माजी आमदार सागर मेघे व आ. समीर मेघे लवकरच संत भोजाजी महाराजांच्या दर्शन घेऊन या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवणार असल्याचे सांगितले. आजनसरा या तीर्थक्षेत्रावरून यवतमाळ जिल्ह्याला जोडणार्या वर्धा नदीवरील रोहिणी घाट येथे होणार्या ३८ कोटी रुपयांच्या पुलाचे भूमिपूजन ना. गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सिरसगाव निधा टाकळी आजनसरा पोहणा या मार्गाची निर्मिती केंद्रीय निधीतून करणार असून वडनेर येथून जाणार्या राष्ट्रीय महामार्गांवरील शेकापूर-आजनसरा चौकात उड्डानपुल बांधन्याची घोषणा ना. गडकरी यांनी केली. संत भोजाजी महाराज महापुजेला पालक मंत्री पंकज भोयर, ना. संजय राठोड, खा. अमर काळे,आ. समिर कुणावार, आ. राजेश बकाने, आ. दादाराव केचे, माजी खा. सुरेश वाघमारे, रामदास तडस, भूपेंद्र शहाणे, डॉ. उपेंद्र कोठेकर, भाजपा जिल्हाध्यक्ष संजय गाते, भाजपाचे माजी अध्यक्ष सुनील गफाट, नगराध्यक्ष नयना तुळसकर, डॉ. राजू मिश्रा, नरेंद्र पांडे, गीता आंबटकर, गुरुकुंज आश्रमचे मोझरीचे माजी सर्वाधिकारी लक्ष्मणराव गमे, आदींची उपस्थिती होती.
यशश्वीतेसाठी देवस्थान कमेटीचे सचिव शिवदास पर्बत, उपाध्यक्ष धनराज मेश्राम, राजेंद्र ढवळे, नामदेव गाढवे, रामाजी कोपरकर, रमेश ठाकरे, विनोद आष्टनकर, श्रावण काचोळे, शालिनी ईखार, महेश कोसूरकर सभासद अंकुश ढवळे, संतोष सुपारे, जेष्ठ नागरिक सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष गंगाधर कोल्हे, सचिव सुधाकर डेकाटे, गणपत गाडेकर, प्रशासकीय अधिकारी गणेश सोनोने, नरेंद्र नाशिरकर व देवस्थान कर्मचारी यांनी सहकार्य केले.