आशा भोसले यांच्या श्रद्धांजलीमुळे पाकिस्तानात वादळ

    दिनांक :14-Apr-2026
Total Views |
इस्लामाबाद,
Asha Bhosle's in Pakistan भारतातील ख्यातनाम गायिका आशा भोसले यांच्या निधनाशी संबंधित बातमी प्रसारित केल्यामुळे पाकिस्तानातील एका दूरचित्रवाहिनीवर कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया नियामक प्राधिकरणने संबंधित वाहिनीला नोटीस बजावत स्पष्टीकरण मागितले आहे. माहितीनुसार, एका वृत्त वाहिनीने आशा भोसले यांच्या निधनाची बातमी देताना त्यांच्या गाण्यांचे आणि चित्रपटांतील दृश्यांचे प्रसारण केले होते. मात्र पाकिस्तानमध्ये भारतीय कार्यक्रमांवर पूर्वीपासूनच निर्बंध असल्याने हे प्रसारण नियमभंग मानले गेले.

Asha Bhosle
 
नियामक संस्थेने आपल्या नोटीसमध्ये नमूद केले आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करून भारतीय सामग्री दाखवण्यात आली असून याबाबत सविस्तर खुलासा करावा. या कारवाईनंतर वाहिनीचे व्यवस्थापकीय संचालक अझहर अब्बास यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, नामवंत कलाकारांच्या निधनानंतर त्यांच्या कार्याचा आढावा घेणे ही पत्रकारितेतील पारंपरिक पद्धत आहे. आशा भोसले यांसारख्या महान गायिकेच्या आठवणी लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तरीदेखील नियामक संस्थेने घेतलेल्या निर्णयामुळे चर्चा रंगली आहे.