वाशीम,
greetings to babasaheb प्रज्ञासुर्य, बोधिसत्व, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, विश्वरत्नडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने विविध उपक्रमाने उत्साहात साजरी करण्यात आली. याावेळी हजारो बहुजन बांधवांनी महामानवाच्या चरणी नतमस्तक होऊन अभिवादन केले. सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करुन समाजाबधंव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहरातील विविध भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मिरवणूकीतील जयभीमच्या घोषाने परिसर दुमदुमून गेला होता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने सकाळी १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला उपस्थित मान्यवरांनी पुष्प अर्पण करून पंचशील ध्वजारोहण करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उत्सव समितीचे अध्यक्ष तेजराव वानखेडे हे होते. तर ध्वजारोहण डॉ. सतीन मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष अनिल केंदळे, जि. प. पतसंस्थेचे अध्यक्ष विजय मनवर, प्रा. दिलीप जोशी, प्रतिभा सोनुने, डॉ. सिध्दार्थ देवळे, डॉ. तुषार गायकवाड, मिलींद तके, विनोद पट्टेबहादूर, अनिल ताजणे, माणिक सोनोने, संगिता इंगोले यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्यासह विविध पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांनी बाबासाहेबाला अभिवादन केले.greetings to babasaheb यावेळी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते भारताचे संविधान या पुस्तकाचे वितरण करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी सकाळपासून उपासक, उपासिकांनी गर्दी केली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर निळ्या पताका लावून सुशोभित करण्यात आला होता. शहरातील विविध भागातील मिरवणुका डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आल्यावर प्रथम बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. वाहनांवर भव्यदिव्य बाबासाहेबांचे कटआऊट लावण्यात आले होते. तसेच डिजे, बँड पथकाच्या तालावर युवक थिरकत होते.
जयंती उत्सव सोहळ यशस्वतीसाठी उत्सव समितीचे अध्यक्ष तेजराव वानखेडे, सचिच शेषराव धांडे, कार्याध्यक्ष दौलत हिवराळे, अरविंद उचित, रमेश भगत, निलेश सोमाणी, वैभव उलेमाले, सोनाजी इंगळे, डिंगाबर साबळे, शेषराव मेश्राम, अजय ढवळे, विनोद तायडे, बबनराव खिल्लारे, प्रमोद खडसे, संजय खडसे, विशाल राऊत, पप्पु घुगे, गजानन गवई, दिनेश पठाडे, यांच्यासह सोशल अॅटीवा फोरम, बौध्द कर्मचारी बहुउद्देशिय मंडळ, संघ मित्रा धम्मसेवा महिला मंडळ, कॉस्ट्राईब कर्मचारी संघटना, कृषी कर्मचारी संघटना, आदर्श बहुजन शिक्षक संघ, भारतीय बौध्द महासभा आदींनी परिश्रम घेतले.