अनिल कांबळे
नागपूर,
Dating app डेटिंग अॅपच्या माध्यमातून तरुणांना आकर्षित केल्यानंतर त्यांना भेटीसाठी महागड्या हाॅटेलमध्ये बाेलावणे आणि तेथे हाॅटेलमालकाशी संगनमत करुन भरभक्कम बील काढून तरुणांना भरण्यास भाग पाडणे, अशी खेळी करणाèया टाेळीचा छडा सदर पाेलिसांनी लावला आहे.सदर पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील एलआयसीसमाेरील सुआ बारमध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बार मालक, व्यवस्थापक, बाउन्सर आणि एका तरुणीविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तरुणीसह चाैघांविरुद्ध गुन्हा दाखल
तक्रारदार तरुण हर्ष (30) साेशल मीडियावर सक्रिय आहे. त्याची तीन महिन्यांपूर्वी ‘हॅपन’ नावाच्या डेटिंग अॅपवरुन मनिषा (काल्पनिक नाव) या तरुणीशी ओळखी झाली. 11 एप्रिल राेजी अॅपवर मनिषासाेबत चॅटिंग केली. काही दिवस चॅटींग करुन तिने त्याला आकर्षित कले. मनिषाने शनिवारी भेटण्याचे ठरविले. यानंतर हर्षने स्वतःचा माेबाईल क्रमांक शेअर केला. काही वेळातच मनिषाने ाेन करून संध्याकाळी एलआयसी बिल्डिंगजवळ भेटण्यास सांगितले. ठरल्याप्रमाणे हर्ष तेथे पाेहाेचला असता एक तरुणी त्याला भेटायला आली. मात्र, अॅपवरील ाेटाे आणि प्रत्यक्ष आलेली तरुणी यात फरक असल्याचे त्याच्या लक्षात आले. याबाबत विचारणा केल्यावर तिने प्राेाइलवरील ाेटाे बहिणीचा असल्याचे सांगत वेळ न दवडता समाेरील सुआ बारमध्ये जाण्याचा आग्रह धरला. बारमध्ये बसल्यानंतर संबंधित तरुणीने अतिशय महागड्या ब्रँडच्या मद्याच्या बाटल्या आणि खाद्यपदार्थांची ऑर्डर द्यायला सुरुवात केली. तिच्या घाईघाईने सुरू असलेल्या ऑर्डरमुळे हर्षला संशय आला. त्याने पुढील ऑर्डर थांबवून बिल मागितले असता वेटरने त्यांच्या हातात 34 हजार रुपयांचे बिल ठेवले. एवढे माेठे बिल पाहून त्याला नवल वाटले. त्यामुळे त्याने बिलामध्ये काहीतरी गडबड झाल्याची तक्रार केली. यापूर्वी वेटरने ऑर्डर देताना भलतेच मेन्यकार्ड आणि बिल आल्यानंतर दुसरेच मेन्यूकार्ड दाखविले. हाॅटेलमध्ये हेच दर असल्याचा दावा केला. हर्षने बार मालकाला बाेलावण्याची मागणी केली. त्यानंतर आकाश नावाच्या व्यक्तीने स्वतःची बार मालक म्हणून ओळख करून देत तक्रारदाराला धमकावण्यास सुरुवात केली. ‘तुझ्याबद्दल आम्हाला सर्व माहिती आहे, बिल भरले नाही तर तुझी बदनामी करू, कपडे काढून बाहेर पाठवू, जीवे मारू,’ या अशा शब्दांत धमकी देऊन जबरदस्तीने बिल भरण्यास भाग पाडले. भीतीपाेटी हर्षने सायंकाळी सुमारे 7.10 वाजता बारच्या क्यूआर काेडवरून ऑनलाइन 34,213 रुपये बिल भरले. दरम्यान, त्याच्यासाेबत आलेली मनिषा संधी साधून तेथून पसार झाली.
महिला आणि बाऊन्सरने दिली धमकी
हर्षने बार व्यवस्थापक प्रिया हिच्याकडे जाऊन बिलाविषयी तक्रार केली. प्रियाने पैसे परत देण्यास नकार देत धमकी दिली. त्याच वेळी तेथे आलेल्या बाउन्सर उज्ज्वलने शिवीगाळ करत उद्या भेट, तुला दाखवताे, अशी धमकी दिली. जर येथून निघून न गेल्यास खाेट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. त्यामुळे हर्ष हा तेथून निघून गेला.
शेकडाे तरुणी टाेळीच्या सदस्य
हर्ष हा निराश हाेऊन बारमधून बाहेर पडला आणि शेजारच्या पानठेल्यावर गेला. त्याने पानठेलाचालकाला घडलेला प्रकार सांगितला. त्याने दरराेज असाच प्रकार हाेत असल्याचे सांगितले. त्या तरुणी नेहमी येथे येतात आणि तरुणांना अशाच प्रकारे लुटतात. हाॅटेलमालक, वेटर, व्यवस्थापक यांच्याशी संगनमत करुन 35 ते 45 हजार रुपये बिल काढून लुटमार केल्याची माहिती हर्षला दिली. डेटिंग अॅपवरून येणाèया तरुणींना वापरून ग्राहकांना या बारमध्ये आणले जाते. हर्षने सदर पाेलिस ठाण्यात तक्रार केली. पाेलिसांनी सर्व आराेपींविराेधात गुन्हा दाखल केला आहे. पाेलिसांकडून बारमधील सीसीटीव्ही ुटेज, आर्थिक व्यवहार आणि या टाेळीने आतापर्यंत किती जणाला फसवले, याबाबत माहिती घेण्यास सुरुवात केली.
बिल वसुलीनंतर वाटाघाटी ?
हर्षने तरुणीच्या सांगण्यावरून मद्यासाेबत चिली पनीर, चिली पाेटॅटाे व रेडबुल घेतले हाेते. बारमधील आराेपींनी त्याचे 34 हजारांहून अधिक बिल लावले. इतक्या किंमती तर पंचतारांकित हाॅटेल्समध्येदेखील नसल्याने हर्षचा संशय बळावला. मुलीली इम्प्रेस करण्यासाठी अनेक तरुण चुपचाप बील भरतात, असा अनुभव या हाॅटेलमधील आहे.