गोंदियात डिजेच्या तालावर थिरलकले ‘भीमसैनिक’

    दिनांक :14-Apr-2026
Total Views |
महामानवाला हजारो अनुयायींचे अभिवादन

गोंदिया, 
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मंगळवारी १४ एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांच्या आयोजनाने उत्साहात साजरी करण्यात आली. विशेषतः शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सोमवार १३ रोजी शहरातील प्रमुख मार्गानी रॅली काढून कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली. यावेळी हजारो भीमसैनिकांनी बाबासाहेबांना अभिवादन केले. विशेष म्हणजे संपूर्ण जिल्ह्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. एंकदरीत ‘जयभीम’च्या घोषणेने जिल्हा दुमदुमला होता.
 
 
bhim
 
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti दरम्यान, मंगळवारी शहरातील भीमनगर, गौतमनगर, कुंभारेनगर, संजयनगर, कस्तुरबा वॉर्ड, रामनगर, वाजपेयी वॉर्ड, श्रीनगर, फुलचूर, गोविंदपूर, छोटा गोंदिया, सूर्याटोला आदी परिसरात सकाळपासूनच डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त ध्वजारोहण आदी विविध कार्यक्रम घेण्यात आले. दरम्यान, दुपारी ४ वाजतानंतर शहरातील विविध ठिकाणाहून मिरवणुक काढण्यात आल्या. मिरवणुक शहराच्या मध्यवर्ती आंबेडकर चौकात एकत्रीत आल्या. येथे विविध सेवाभावी संस्था, पुढारी, दानसूर व्यक्तिंकडून अल्पोहार, शरबत, फळांचे वितरण करण्यात आले. याशिवाय डॉ. आंबेडकरांच्या जीवनावरील पुस्तके, ग्रंथ विक्रीचे स्टॉल लावण्यात आले होते. शहरातील विविध ठिकाणाहून डीजे, बँडच्या तालात नृत्य करत डॉ. बाबासाहेबांच्या अनुयायांनी ‘जय भीम’ चा जयघोष केला. शहरातील दुर्गा चौक, नेहरु चौक, गांधी प्रतिमा चौक, श्री टॉकीज रोड, मनोहर चौकातून भ्रमण करीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात या रॅलीचे समापन करण्यात आले. यावेळी विविध ठिकाणी सामाजिक संघटनांव्दारे शीतपेय, महाप्रसाद, आलूपोहा, पुलाव, मिष्टान्न, पिण्याच्या पाण्याचे स्टॉल लावण्यात आले होते. यासह तिरोडा, गोरेगाव, अर्जुनी मोर, सडक अर्जुनी, आमगाव, सालेकसा येथेही बाबासाहेबांच्या अनुयायांसह विविध संघटना, पक्षांतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी हजारो भिमसैनिक, राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी हजेरी लावून बाबासाहेबांना अभिवादन केले.