समरस समाजाच्या संदेशाने आंबेडकर जयंती साजरी

    दिनांक :14-Apr-2026
Total Views |
नागपूर
Dr. Babasaheb Ambedkar सामाजिक समरसता गतिविधी” अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.यामध्ये शुद्ध चित्त बुद्ध विहार येथे डॉ. आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर बौद्ध भिक्षूंनी त्रिशरण पंचशील वंदना घेत मार्गदर्शन केले.
 

jayanti 
 
तसेच शाक्यमुनी बौद्ध विहार येथेही प्रतिमेस माल्यार्पण करून पंचशील वंदना कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात विविध पदाधिकारी व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते Dr. Babasaheb Ambedkar .कार्यक्रमातून “एकच ध्येय – समरस समाज, एकत्र भारत” हा संदेश देण्यात आला. सर्व स्वयंसेवकांच्या सहभागामुळे कार्यक्रम उत्साहात पार पडला.
सौजन्य :अमोल बोन्द्रे,संपर्क मित्र