डॉ. संजय रोठे यांना राज्यस्तरीय राष्ट्रमाता जिजाऊ पुरस्कार

    दिनांक :14-Apr-2026
Total Views |
मानोरा,
dr sanjay rothe येथील बाजार समितीचे सभापती डॉ. संजय रोठे यांना अमरावती येथे आयोजित भव्य कार्यक्रमात राज्यस्तरीय राष्ट्रमाता जिजाऊ पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांचा सहपत्नीक शाल, श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अंबाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, अमरावती यांच्या वतीने दरवर्षी संपूर्ण राज्यातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींचा सन्मान करण्यात येतो.
 

dr sanjay rothe 
 
 
याच अनुषंगाने यंदा डॉ. संजय रोठे यांची निवड करण्यात आली.डॉ. रोठे यांनी सामाजिक, शैक्षणिक तसेच कृषी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या कार्यामुळे मानोरा तालुयाचे नाव राज्यस्तरावर उंचावले असून, त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.dr sanjay rotheया कार्यक्रमास संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा माधुरी चव्हाण, आमदार सुलभा खोडके, संचालिका वनिता इंगळे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.दरम्यान, या सन्मानामुळे मानोरा तालुयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध स्तरातून डॉ. संजय रोठे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.