अमरावतीत विशेष कार्यक्रम
अमरावती,
आकाश निरीक्षणाची आवड असलेल्या नागरिकांसाठी एक दुर्मिळ आणि Fascinating celestial phenomenonआकर्षक खगोलीय घटना अनुभवण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. १८ एप्रिल २०२६ रोजी पहाटे ‘प्लॅनेट परेड’ म्हणजेच ग्रहांची रांग पाहायला मिळणार आहे. या वेळी बुध , मंगळ, शनि आणि नेपच्यून हे ग्रह पूर्व दिशेला एकाच रेषेत जवळजवळ दिसणार आहेत.
या विशेष घटनेचे औचित्य साधून मराठी विज्ञान परिषद अमरावती विभाग अंतर्गत कार्यरत स्टार गेझर क्लबतर्फे ऑर्किड स्कूल येथे शालेय विद्यार्थ्यांकरिता विशेष आकाश निरीक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. अनेक ग्रह एकाच वेळी आकाशात एकाच दिशेत जवळजवळ दिसणे म्हणजेच प्लॅनेट परेड होय. हे ग्रह प्रत्यक्षात एका रेषेत नसले तरी पृथ्वीवरून पाहताना ते एकाच भागात दिसतात. अशा घटना क्वचितच घडतात आणि खगोलप्रेमींसाठी अत्यंत आकर्षणाचे केंद्र ठरतात. पहाटे ०४. ४५ ते ०५.२० या वेळेत पूर्व ते ईशान्य दिशेच्या दरम्यान क्षितिजाच्या अगदी जवळ हे दृश्य दिसणार आहे.या वेळेत आकाश तुलनेने अंधारात असते आणि ग्रह स्पष्ट दिसण्याची शक्यता जास्त असते.
Fascinating celestial phenomenon खगोल प्रेमी व नागरिकांनी पूर्व दिशेला मोकळे आकाश असलेले ठिकाण निवडावे. शक्य असल्यास दुर्बीण किंवा बायनॉक्युलर वापरावा. हवामान स्वच्छ असल्यासच दृश्य स्पष्ट दिसेल. १८ एप्रिल २०२६ रोजीची ही ग्रहांची रांग ही खगोलप्रेमींसाठी एक अनोखी पर्वणी ठरणार आहे. अशा दुर्मिळ घटनांचे प्रत्यक्ष निरीक्षण केल्याने विज्ञानाबद्दलची जिज्ञासा वाढते आणि विश्वाबद्दलची समज अधिक व्यापक होते. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आकाशीय सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्रा. प्रवीण गुल्हाने व खगोल विभाग प्रमुख विजय गिरुळकर यांच्यातर्फे करण्यात आले आहे.