नागपूर,
shrubland rock eagle रॉक ईगल घुबड ही मोठ्या शिंगांच्या घुबडांची एक प्रजाती असून भारतातील डोंगराळ झुडपी जंगलांमध्ये आढळून येते. पक्षी व निसर्ग छायाचित्राची आवड असलेल्या आनंद कानडे यांनी नागपूरच्या ग्रामीण भागात हा पक्षी बघितला आणि त्याचा फोटो काढला.
मुख्यत: रॉक ईगल घुबड जंगलात दिसून येतो. मोठ्या घुबडाची ही एक प्रजाती असून डोंगराळ झुडपी भागात दिसून येते. सहसा तपकिरी आणि राखाडी रंगाच्या या घुबडाच्या घशावर पांढर्या व काळ्या पट्ट्या दिसून येतात. पूर्वी याला युरेशियन गरुड-घुबडाची एक उपप्रजाती मानले जात होते. त्याची पिल्ले पांढर्या मऊ पिसांसहित जन्माला येतात, जी सुमारे दोन आठवड्यांनंतर पिसे गळण्याच्या प्रक्रियेदरम्यान हळूहळू ठिपकेदार बदलली जातात. रॉक ईगल घुबड सहसा जोडीने आढळते. त्याचा आवाज खोल आणि घुमणारा असतो , जो पहाटे आणि संध्याकाळी ऐकू येतो.shrubland rock eagle हिमालयाच्या दक्षिणेकडील भारतीय उपखंडाच्या मुख्य भूभागातील खडकाळ ठिकाणी आढळतात. रॉक ईगल घुबडाच्या डोक्यावर मोठे कानाचे गुच्छे असतात. बेंगाल ईगल घुबड या नावाने देखील हे ओळखले जाते.