हिंगणघाटात रा. स्व. संघाकडून महामानवास अभिवादन

    दिनांक :14-Apr-2026
Total Views |
हिंगणघाट,
tribute dr babasaheb ambedkar भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंगणघाट शहराच्या वतीने अभिवादन करून आदरांजली अर्पण करण्यात आली.
 
 
tribute dr babasaheb ambedkar
 
 
सकाळी ९ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेबाच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वर्धा जिल्हा संघचालक जेठानंद राजपूत, नगर संघचालक विनोद नांदुरकर, नगर कार्यवाह श्यामसुंदर मेघरे, नगर सहकार्यवाह पंकज आत्राम, प्रमोद हंबर्डे, विकास नागरकर, अजय वानखेडे, किशोर कोसुरकर, प्रमोद सातघरे, अतुल चिलविडवार, विनोद डोमकावळे, ईश्वर चंदनखेडे, अंकित कुलकर्णी, दिनेश मुडे, सिद्धार्थ तुपे, संजय वंजारी, बंडू सिडाम, सचिन खंदार आदी स्वयंसेवक उपस्थित होते.