बांबेझरी-कुसुंबी प्रकरणी तोडगा काढण्याचे आश्वासन
चंद्रपूर,
बांबेझरी व कुसुंबी येथील शेतकर्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर शासन आणि प्रशासन अत्यंत संवेदनशील असून, त्यावर योग्य तोडगा काढण्यासाठी शासन आणि जिल्हा प्रशासन सकारात्मक आहे, अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे Guardian Minister Dr. Ashok Uike पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिली. या प्रश्नासाठी विष प्राशन करणार्या शेतकर्यांची त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली.
विष घेतल्याने रुग्णालयात भरती शेतकरी जंगू पेंदोर, मारुती तलांडे, जयराम कुडमेथे, बाळू सिडाम, लच्छू आत्राम यांच्याशी तसेच त्यांच्या कुटुंबियांशी पालकमंत्र्यांनी संवाद साधला व त्यांच्या समस्याही ऐकूण घेतल्या. शासन आणि प्रशासन कोणालाही वार्यावर सोडणार नाही. राज्य सरकार शेतकर्यांच्या पाठिशी ठामपणे उभे असल्याचेही त्यांनी या शेतकर्यांना आश्वस्थ केले. यावेळी आ. किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, मनपा आयुक्त अकुनुरी नरेश, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आदी उपस्थित होते.
Guardian Minister Dr. Ashok Uike यावेळी डॉ. उईके म्हणाले, घडलेली घटना दुर्देवी आहे. यावर नक्कीच तोडगा काढला जाईल. पुढील आठ दिवसांत जिल्हाधिकारी स्वत: जिवती येथे येऊन या प्रश्नावर शेतकर्यांशी सकारात्मक चर्चा करतील. जीव हा अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे कोणीही टोकाचे पाऊल उचलू नये. विषबाधित रुग्णांच्या प्रकृतीकडे आम्हा सर्वांचे लक्ष आहे. चांगले उपचार करण्याच्या सुचना सर्व डॉक्टरांना पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत. तसेच सुट्टी झाल्यावर सर्व रुग्णांना रुग्णालयाच्या वाहनाने घरी पोहचवून देण्याचेही निर्देश दिले.