सोलर हाय मस्ट लाईट प्रकल्पात प्रचंड अपहार

चौकशी करुन अहवाल करण्याचे निर्देश

    दिनांक :14-Apr-2026
Total Views |
मानोरा, 
solar high mast light project वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत वाशीम जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या सोलर हाय मस्ट लाईट प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याची गंभीर तक्रार समोर आली असून, यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. प्रकाश राठोड यांनी ११ फेब्रुवारी रोजी दिलेल्या तक्रारीनुसार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखेतील कार्यकारी अभियंता यांच्या कार्यकाळात सन २०२३-२४ मध्ये जिल्ह्यातील तब्बल २० गावांमध्ये सोलर हाय मस्ट लाईट बसविण्याच्या कामात अनियमितता व आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
 

solar high mast light project 
 
या गंभीर तक्रारीची दखल घेत महाराष्ट्र शासनाने संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. अधीक्षक अभियंता (विद्युत) तथा समन्वय अधिकारी, मुंबई प्रादेशिक विद्युत मंडळ यांना यासंदर्भात चौकशी करून स्वयंस्पष्ट अभिप्रायासह तात्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.solar high mast light project कक्ष अधिकारी मंदार कोचरेकर यांनी या संदर्भात अधिकृत पत्र जारी केले असून, संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, ग्रामीण भागाच्या विकासासाठी असलेल्या महत्त्वाच्या योजनेतच गैरप्रकार झाल्याच्या आरोपांमुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.