इंदूरमधील औद्योगिक परिसरात स्फोट, चार ठार

    दिनांक :14-Apr-2026
Total Views |
इंदूर,
Indore industrial accident इंदूर जिल्ह्यातील पिठामपूर औद्योगिक परिसरातील तरपुरा येथील रामकी एन्वायरो कंपनीमध्ये झालेल्या स्फोटात चार जणांचा मृत्यू झाला.
 

Indore industrial accident 
भोपाळ गॅस दुर्घटनेशी संबंधित युनियन कार्बाइडच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे काम करत सुरू असताना हा स्फोट झाला. स्फोट इतका शक्तिशाली होता की त्याचा आवाज दूरवर ऐकू आला, ज्यामुळे आजूबाजूच्या परिसरात घबराट पसरली. घटनेची माहिती मिळताच पोलिस, अग्निशमन दल आणि प्रशासकीय पथके तत्काळ घटनास्थळी दाखल झाली. जखमींना इंदूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले, तिथे चार कामगारांना मृत घोषित करण्यात आले. घटनेनंतर संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. स्फोटाचे नेमके कारण अद्याप उघड झालेले नाही.