आशा भोसलेंच्या जाण्याने नात जनाई व्यथित!

    दिनांक :14-Apr-2026
Total Views |
मुंबई.
Janai is distressed by the loss of Asha दिग्गज पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या निधनानंतर त्यांची नात जनाई भोसलेने प्रथमच भावना व्यक्त केल्या आहे. आजीच्या जाण्याने व्यथित झालेल्या जनाईने समाजमाध्यमांवर फोटो शेअर करत आपल्या मनातील दुःख व्यक्त केले आहे. आपल्या भावना व्यक्त करताना जनाई म्हणते, सध्या तिची अवस्था शब्दांत मांडणे कठीण आहे. योग्य वेळ आल्यावर ती अधिक काही बोलेल, मात्र आत्ताच्या घडीला तिला एवढेच सांगायचे आहे की तिच्या आजीला समाजातील सर्व स्तरांतून अपार प्रेम आणि सन्मान मिळाला. या प्रेमाबद्दल तिने सर्वांचे मनापासून आभार मानले असून आशा भोसले यांचे स्थान प्रत्येकाच्या मनात कायम राहील, असा विश्वासही तिने व्यक्त केला.
 
 

Janai is distressed by the loss of Asha
एका छायाचित्रात ती आपल्या आजीला अखेरचा निरोप देताना दिसत असून त्या क्षणाचे वर्णन करताना तिने अत्यंत भावनिक शब्दांत निरोप दिला आहे. तिच्या या पोस्टनंतर अनेकांनी श्रद्धांजली अर्पण करत सांत्वन व्यक्त केले आहे.दरम्यान, जनाई भोसले लवकरच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असून पुढील वर्षी तो प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. गाण्याचीही आवड असलेल्या जनाईचा आवाज मधुर असल्याचे तिच्या चाहत्यांचे मत असून ती समाजमाध्यमांवर आपल्या गायनाचे अनेक व्हिडिओ शेअर करत असते, ज्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.