नागपूर,
jungle safari जंगल सफारीच्या नियमांचे उल्लंघन करून वाघाचा रस्ता अडविल्याची घटनेनंतर वनविभागाने जिप्सीचालक व गाइडला दिवसांसाठी निलंबित केले आहे. मोगरकसा राखीव संवर्धन क्षेत्राच्या भद्रादेव मार्गावर ११ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास घडली असून, याप्रकरणी वनविभागाने जिप्सीचालक व गाइडला दिवसांसाठी निलंबित केले आहे. १५ वन अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोगरकसा राखीव क्षेत्राच्या भद्रादेव मार्गावर रस्ता ओलांडत असताना जिप्सीचालक राहुल भाटपाई यांनी जिप्सी चुकीच्या पद्धतीने उभी करून वाघाचा रस्ता रोखला. या प्रकारणी गंभीर दखल घेत विभागीय वन अधिकार्यांनी संबंधित वाहनासह चालक राहुल भटपई आणि गाईड नीलेश मेहर यांच्यावर कारवाई करून त्यांना जंगल सफारीसाठी १५ दिवस बंदी घातली आहे.
सफारी परवाना रद्द इशारा
ही बंदी ३० एप्रिलपर्यंत लागू राहणार आहे. अशा प्रकारचे वर्तन हे सफारीसंदर्भातील नियमांचे उल्लंघन आहे. वाघासारख्या शिकारी प्राण्यांच्या बाबतीत त्यांना कमीत कमी त्रास होईल, यासाठी नियमांचे काटेकोर पालन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात अशा प्रकारची घटना पुन्हा घडल्यास संबंधितांवर तीन महिन्यांपर्यंत निलंबन किंवा सफारी परवाना कायमस्वरूपी रद्द कारवाई येईल, असा इशाराही वनविभागाने दिला आहे.