कामगार निदर्शनांसाठी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप, क्यूआर कोड

कॉल सेंटरसारखी व्यवस्था

    दिनांक :14-Apr-2026
Total Views |
नवी दिल्ली,
labour protest India WhatsApp groups कमी वेतनाच्या विरोधात सोमवारी हादरवून सोडणारे कामगारांचे हिंसक आंदोलन समाज माध्यम, विशिष्ट व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्स आणि एका संशयित कॉल सेंटरसारख्या व्यवस्थेचा वापर करून पद्धतशीरपणे आखण्यात आले होते, असे पोलिसांनी मंगळवारी सांगितले.या अचानक झालेल्या आंदोलनाचा तपास सुरू आहे.
 

labour protest India WhatsApp groups, 
या घटनेचे स्वरूप पाहता हा उत्स्फूर्त उद्रेक नसून, त्याऐवजी ही एक पद्धतशीर आणि तंत्रज्ञानावर आधारित मोहीम असल्याचे दिसून येते. कारण, पोलिसांनी आतापर्यंत सुमारे 400 जणांना अटक केली आहे, अशी माहिती गौतम बुद्ध नगर येथील पोलिस आयुक्त लक्ष्मीसिंह यांनी दिली. कामगारांना एक संघटित गट चिथावणी देत आहे आणि पद्धतशीरपणे काही गोष्टी पुढे रेटत आहे. मागील काही दिवसांत केवळ तीन ते चार दिवसांत अनेक बनावट एक्स हॅण्डल्स आणि इतर समाज माध्यम खाती तयार करण्यात आली आहेत, असे त्या म्हणाल्या. कुणीतरी कॉल सेंटरसारखी यंत्रणा चालवत असावे किंवा अशांतता भडकवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर समन्वित पद्धतीने करीत असावे, असे दिसत असल्याचे लक्ष्मीसिंह यांनी सांगितले.
जमाव गोळा करा labour protest India WhatsApp groups आणि पोलिस कर्मचाèयांना लक्ष्य करा, अशी एका प्रकरणात चिथावणी देणारी ध्वनिफीत व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर फिरत आहे. पोलिसांवर हल्ल्यासाठी आपण उद्या सज्ज राहिले पाहिजे. त्यांच्यावर लाठीहल्ला करावा. त्यासाठी सकाळी प्रत्येकाने एकत्र येण्याची गरज आहे, असे या ध्वनिफितीत म्हटले आहे.
सोबत तिखट आणा
लाठीमार झाल्यास पोलिसांविरुद्ध वापरण्यासाठी तिखट बाळगण्याची चिथावणी दिली जात असल्याचा एक इन्स्टाग्राम ग्रुप चॅट उघडकीस आला. भावा, लाठ्या उचलण्याची गरज नाही. केवळ तिखट सोबत बाळग. ते पुरेसे आहे. प्रकरण तिथेच संपेल, असे एका संदेशात म्हटले आहे. सर्व बंधू-भगिनींना विनंती आहे, त्यांनी मोठ्या प्रमाणात एकत्र यावे तसेच सोबत तिखट आणावे, असे आवाहन एका संदेशात करण्यात आले आहे.
 
 
चॅट्स आणि ध्वनिफितींची ओळख पटली
अशा चॅट्स आणि ध्वनिफितींची ओळख पटवण्यात आली आणि त्याचा तपास केला जात आहे, अशी माहिती नोएडातील एका वरिष्ठ पोलिस अधिकाèयाने दिली. या कार्यपद्धतीमध्ये विविध माध्यमांद्वारे जलद डिजिटल एकत्रीकरणाचा समावेश होता. अल्पावधीत अनेक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करण्यात आले. त्यामध्ये कार्यकर्त्यांना क्यूआर कोडद्वारे जोडण्यात आल्याचे सांगितले गेले. या पद्धतीमुळे आयोजकांना आपली निनावी ओळख कायम राखत, सहभागींची संख्या वेगाने वाढवणे शक्य झाले.