वर्धा,
Maharashtra employees strike वर्षानुवर्ष प्रलंबित असलेल्या मागण्या, समस्या निकाली न काढता पुन्हा नवनवीन समस्या निर्माण करून राज्यातील शिक्षक, कर्मचार्यांना वेठीस धरणे सुरू असल्याने अखेर राज्य कर्मचारी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समितीने आक्रमक भूमिका घेत २१ एप्रिल पासून बेमुदत संप करण्यात येणार आहे.
जुन्या पेन्शन योजनेंतर्गत सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची अधिसूचना काढण्यात यावी, टीईटी पात्रता परीक्षा सरसकट सर्व शिक्षकांवर लादण्यात येऊ नये, १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुत शिक्षक, कर्मचार्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, चतुर्थश्रेणी व वाहन चालक भरती वरील बंदी उठवावी, कंत्राटी कर्मचार्यांच्या सेवा नियमित करण्यात यावे, १०-२०-३० आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात यावे, १५ मार्च २०२४ चा शासन निर्णय रद्द करण्यात यावा, सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करण्यात यावे, विना अनुदानित शाळांना १०० टके वेतन देण्यात यावे आदी मागण्यासाठी बेमुदत संप करण्यात येणार आहे.
याबाबतची सभा जलसंपदा भवन येथे पार पडली. राज्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दीपक धाबर्डे, सरचिटणीस पंकज आगलावे, कार्याध्यक्ष प्रशांत भोयर, मुख्य सल्लागार हरिश्चंंद्र लोखंडे, प्रहार शिक्षण संघटनेचे नागपूर विभाग प्रमुख अजय भोयर, आदी उपस्थित होते.