अनिल कांबळे
नागपूर,
MHT CET exam अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, आणि कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटीच्या पीसीएम समूहासाठीची परीक्षा इसासनीतील रायसाेनी काॅलेजमधील परीक्षा केंद्रावर घेण्यात आली. मात्र, या महाविद्यालयाने रखरखत्या उन्हात विद्यार्थ्यांना जवळपास तास ते दीड तास ताटकळत उभे ठेवल्याची तक्रार अनेक पालकांनी केली आहे. काही विद्यार्थ्यांनी साेशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. परीक्षा केंद्रावरील अपुèया सुविधांवर त्यांनी नाराजी व्यक्त केली.
सीईटी परीक्षा सकाळ MHT CET exam व दुपार या दाेन सत्रात घेण्यात येते. दाेन्ही सत्रात मिळून राज्यातील 36 जिल्ह्यातील 201 परीक्षा केंद्रावर 59 हजार 724 विद्यार्थ्यांपैकी 57 हजार 290 विद्यार्थ्यांची (95.92 टक्के) उपस्थिती हाेती. या पीसीएम सीईटीमध्ये राज्यात आज एकूण 2 हजार 434 विद्यार्थी अनुपस्थित हाेते. याशिवाय नागपूर विभागातून 502 विद्यार्थी अनुपस्थित हाेते. 11 ते 20 एप्रिलदरम्यान सीईटी सुरू असून त्यासाठी राज्यातून 4 लाख 79 हजार 332 विद्यार्थ्यांनी नाेंदणी केली. साेमवारी सकाळी इसासनीतील रायसाेनी काॅलेजमधील परीक्षा केंद्रावर विद्यार्थी गेले. त्यानंतर परीक्षेच्या एक तासाआधी विद्यार्थ्यांना परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाताे. यासाठी विद्यार्थ्यांना दाेन तासांपासून रांग लावण्यास सांगण्यात आले. त्यामुळे उन्हामध्ये विद्यार्थ्यांना उभे राहावे लागले. रायसाेनी महाविद्यालयाच्या परिसरात यावेळी उन्हापासून बचाव करण्यासाठी कुठलीही सुविधा नव्हती. जवळपास दीड तास विद्यार्थी उन्हात उभे राहिल्याने पालकांनी याविषयी राेष व्यक्त केला. परंतु, परीक्षा केंद्रातील कुणीही याचा प्रतिसाद न दिल्याने पालकांचा राग अनावर झाल्याने गाेंधळाची परिस्थिती निर्माण झाली हाेती.