तरुणीच्या बॅगेतून 4.26 काेटींचे काेकेन जप्त

डीआरआयची नागपुरातील सर्वात माेठी कारवाई

    दिनांक :14-Apr-2026
Total Views |
अनिल कांबळेे

नागपूर,
DRI Nagpur biggest drug bus रेल्वेने प्रवास करुन नागपुरातील अजनी रेल्वे स्थानकावर उतरलेल्या एका तरुणीच्या मेकअपच्या किटमध्ये तब्बल 4 काेटी 26 लाख रुपये किंमतीचे काेकेन आढळून आले. या तरुणीचे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करांशी संबंध असल्याची माहिती समाेर आली असून डीआरआयची गेल्या 10 वर्षांतील सर्वात माेठी कारवाई असल्याची माहिती आहे.
 

Nagpur cocaine seizure, DRI Nagpur biggest drug bust, 
महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआयची) नागपूर पथकाने रविवारी ही कारवाई केली. हजरत निजामुद्दीन-बेंगळुरू राजधानी एक्सप्रेस मधून काेकेनची तस्करी केली जात असल्याची माहिती डीआरआयच्या नागपूर पथकाला मिळाली. त्यावरून पथकातील अधिकाèयांनी अजनी रेल्वेस्थानकावर सापळा रचला. गाडी रविवारी नागपूर स्थानकावर पाेहचताच गाडीतील एका संशयीत तरुणीवर अधिकाèयांनी नजर ठेवली. अजनी स्थानकावर ती थांबली असता संशयीत तरुणीला उतरविण्यात आले. तिच्या जवळच्या बॅगेची तपासणी करून तब्बल 853 ग्रॅम काेकेन जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या काेकेनची आंतरराष्ट्रीय काळ्या बाजारातील किंमत सुमारे 4 काेटी 26 लाख रुपये असल्याचे सांगितले जाते. या प्रकरणी एका तरुणीला अटक करण्यात आली. ही कारवाई हाेताच ड्रग्ज तस्करांमध्ये माेठी खळबळ उडाली आहे. तरुणीकडे हे काेकेन नेमके कुठून आले आणि ती हे काेकेन काेणाकडे पाेचवणार हाेती, याचा तपास डीआरआयचे पथक करत असून तिच्या नावाबद्दल गुप्तता पाळण्यात येत आहे.
तपास पथक झाले थक्क
डीआरआयचे तपास अधिकारी तरुणीकडे असलेल्या बॅगची तपासणी करीत हाेते. मात्र, बॅगमध्ये काहीही आढळून न आल्यामुळे ते चकित झाले. बॅगमध्ये काही कपडे, मेकअपचे सामान आणि प्रवासादरम्यान काही रक्कम एवढेच सामान तिच्याजवळ आढळले. मात्र, बॅगेत ठेवलेल्या दाेन शॅम्पूच्या बाटल्या अधिकाèयांना संशयास्पद वाटल्या. त्यामुळे त्या बाटल्यांमधील शॅम्पू काढल्यानंतर त्यामध्ये पिवळ्या रंगाच्या 50 कॅप्सूल्स सापडल्या. या कॅप्सूल्समध्ये भुरकट रंगाचे पावडर स्वरूपात काेकेन लपवून हाेते. फील्ड ड्रग टेस्ट किट’द्वारे तपासणी केल्यावर ताे पांढरा पावडर म्हणजेच पदार्थ काेकेनच असल्याचे निष्पन्न झाले.
 
 
तरुणी माेठ्या नेटवर्कची सदस्य
अटक करण्यात आलेल्या DRI Nagpur biggest drug bus तरुणीचा वापर ड्रग्ज पेडलर म्हणून करण्यात येत हाेता. तरुणीकडे सव्वाचार काेटींच्या वर किंमत असलेले 853 ग्रॅम काेकेन सापडल्याने तरुणी माेठ्या नेटवर्कमधील टाेळीची सदस्य असल्याची माहिती समाेर आली आहे. यापूर्वी केवळ 20 ते 30 लाख रुपयांचे काेकेनची तस्करी करण्यात येत हाेती. मात्र, अटकेतील तरुणीवर ड्रग्ज माीयांचा माेठा विश्वास असल्यामुळे काेट्यवधी रुपयांचे ड्रग्ज तिच्या स्वाधीन केल्याचे समाेर आले आहे. तरुणीला रविवारी 12 एप्रिलला अटक करण्यात आली. न्यायालयाने तिला न्यायालयीन काेठडीत पाठवण्याचे आदेश दिले. तरुणीच्या टाेळीचा शाेध तपास अधिकारी घेत आहेत.