अनिल कांबळे
नागपूर,
Nagpur ganja seizure अन्य राज्यांतून गांजाची तस्करी करून शहरात पाठविणाऱ्या तस्कराच्या घरावर तहसील पाेलिसांनी छापा टाकत सुमारे 14 लाख 36 हजार रुपयांचा गांजा जप्त केला. आराेपीला अटक करून पाेलिस त्याच्या साखळीकबाबत चाैकशी करीत आहेत. माेहम्मद इमरान माेहम्मद हारून (वय 30, रा. तकिया दिवानशाह, माेमिनपुरा) असे अटकेतील आराेपीचे नाव आहे.
इमरान हारुन अनेक दिवसांपासून शहरात माेठ्या प्रमाणात गांजाचा पुरवठा करत असल्याची माहिती ठाणेदार संजय मेंढे यांना मिळाली हाेती. या माहितीच्या आधारे पाेलिसांनी त्याला रंगेहात पकडण्यासाठी सापळा रचला. रविवारी रात्री आराेपीच्या घरात माेठी गांजाची खेप आली असून ताे शहरातील गांजा विक्रेत्यांना त्याचा पुरवठा करणार असल्याची माहिती मिळताच पाेलिसांना मिळाली. रात्री सुमारे 9.30 वाजता त्याच्या घरावर छापा टाकण्यात आला. तपासणीदरम्यान प्लास्टिकच्या 5 पाेत्यांमध्ये 57 किलाे 470 ग्रॅम गांजा आढळून आला. या कारवाईत पाेलिस निरीक्षक संजय मेंढे यांच्या नेतृत्वात इतर कर्मचाèयांनी सहभाग घेतला. पाेलिसांनी आराेपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा नाेंदवून त्याला अटक केली. तसेच हा गांजा कुठून आणला आणि शहरातील काेणकाेणत्या विक्रेत्यांना पुरवठा केला जात हाेता, याचा तपास सुरू आहे.