पत्नीशी झाला वाद अन् रागाच्या भरात मित्राचा केला खून

मित्राच्या हत्येप्रकरणी आराेपीला जन्मठेप

    दिनांक :14-Apr-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर,

Nagpur murder case घरात पत्नीशी भांडण झाल्यानंतर युवकाने मनसाेक्त दारु ढाेसली. वस्तीत िफरताना अभियंता असलेला मित्र भेटला. त्याने पत्नीशी वाद झाल्याचे सांगितल्यानंतरही मित्राने त्याला भावनिक आधार दिला नाही. त्यामुळे रागाच्या भरात त्याने मित्राचा दगडाने ठेचून खून केला. मित्राची हत्या करणाèया आराेपीला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एम. मिश्रा यांनी दाेषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अंकुश गणेश गाखरे (वय 33, रा. साैभाग्यनगर, हुडकेश्वर) असे दाेषी आराेपीचे नाव आहे. त्याच्यावर चक्रपाणीनगर, पिपळा राेड येथील धवल पांडुरंग नाटकर (वय 33) याची हत्या केल्याचा आराेप हाेता.
 
 

Nagpur murder case
धवल नाटकर हे इलेक्ट्रिकल अभियंता हाेते आणि आई-वडिलांच्या निधनानंतर ते एकटे राहत हाेते. आराेपी अंकुश हा ई-रिक्शा मेकॅनिक असून दाेघांमध्ये मैत्री हाेती. 7 जून 2024 राेजी रात्री अंकुशने मद्यप्राशन केले हाेते. यावरून त्याचा पत्नीशी वाद झाला. रागाच्या भरात ताे घराबाहेर पडला. रात्री सुमारे 10 वाजता धवल बहिणीकडून जेवण करून आपल्या खाेलीकडे जात असताना दाेघांची भेट झाली. अंकुशने घरातील वादाची माहिती दिली असता, धवलने त्याला समजावण्याऐवजी उलट शिवीगाळ करत चेष्टा केली. यामुळे संतप्त झालेल्या अंकुशने रस्त्यातील दगड उचलून धवलच्या डाेक्यावर वार केला. यात धवल यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या प्रकरणी धवल यांचे जावई सारंग यांच्या तक्रारीवरून पाेलिसांनी खुनाचा गुन्हा नाेंदवून अंकुशला अटक केली. पाेलिसांनी यांनी Nagpur murder case तपास करून न्यायालयात आराेपपत्र दाखल केले. सरकारी वकील राम अनवाने यांनी युक्तिवाद करत आराेपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध केला. न्यायालयाने अंकुश गाखरे याला दाेषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या प्रकरणात हेड काॅन्स्टेबल सुनीता गाेटमुकुलवार यांनी पैरवी अधिकारी म्हणून सहाय्य केले.