स्नेहभेटीतून मिळाली नवीन ऊर्जा

४५ वर्षानंतर वर्गमित्रांची भेट

    दिनांक :14-Apr-2026
Total Views |
रिसोड,
classmate meeting ४५ वर्षानंतर वर्ग मित्रांच्या स्नेह भेटीतून नवीन ऊर्जा मिळाली ही ऊर्जा पुढील आयुष्य जगण्यासाठी दीपस्तंभ ठरेल अशी आशा श्री बाकलीवाल विद्यालयातील १९८१ बॅच च्या वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
 


स्नेहभेटीतून मिळाली नवीन ऊर्जा 
 
१९८१ बॅच मधील वर्ग दहावीचे विद्यार्थ्यांचे स्नेहमिलन १२ एप्रिल रोजी वाशीम येथील एका हॉटेलमध्ये संपन्न झाले. समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात कार्यरत असणार्‍या या विद्यार्थ्यांनी आपली ओळख देताना आपल्या आई-वडिलांसोबत श्री बाकलीवाल विद्यालय व तेथील गुरुजनांनी दिलेल्या संस्कारामुळेच आपण प्रगती केली असे भावपूर्ण उद्गार काढले.classmate meeting व्यापारी, वकील, डॉटर, शिक्षक, प्राध्यापक, शेतकरी, नोकरी अशा विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या या मित्रांनी भेटीतून संवाद साधत आनंद व्यक्त केला. स्नेहभोजनाने या स्नेहमिलन कार्यक्रमाची सांगता झाली.
 
यावेळी राजेश चरखा, संजय वर्मा, बालाप्रसाद शर्मा, रमेश फुलंबरकर, महादेव जवादे, रघुनाथ इंगळे, जयंत वसमतकर, डॉ. दिलीप सोमानी, संतोष राऊत, शैलेश जांगडे, अ‍ॅड. अरुण केला, प्रा. अरुण सरनाईक, उमेश महामुने, रवींद्र व्यवहारे, शशिकांत इंगोले, प्रा. अरविंद देशमुख, सतीश चांडक, प्रमोद पाटणी, जयप्रकाश अग्रवाल, अनिल छापरवाल, राजेंद्र गंगवाल, गोपाल मालू, अशोक अग्रवाल, संजय रंधवे, श्याम मुंधरे, संजय जगताप, बालकृष्ण गट्टाणी, अनिल मानेकर, रवींद्र उदासी, शैलेश दुरतकर, चंद्रकांत भिकने, सुनील मालपाणी उपस्थित होते.