अमरावतीत पाच वर्षात २.४६ लाख नवी वाहने

    दिनांक :14-Apr-2026
Total Views |
जिल्ह्यात आता १० लाखावर वाहने
 
अमरावती, 
Amravati: New vehicles अमरावती प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) वाहन नोंदणीनुसार अमरावती जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत वाहनसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. मार्च २०२१ मध्ये जिल्ह्यात एकूण ८ लाख ३७ हजार ७७३ वाहने नोंदणीकृत होती. ती संख्या मार्च २०२६ अखेर १० लाख ८४ हजार २५० इतकी झाली आहे. म्हणजेच पाच वर्षांत २ लाख ४६ हजार ४७७ नव्या वाहनांची भर पडली आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी अनिल मानकर यांनी दिली.
 
 
New vehicles
 
Amravati: New vehicles  वाहन हे केवळ गरज नसून आता प्रत्येक कुटुंबाचा अविभाज्य घटक बनत चालले आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातही रस्ते सुविधा सुधारल्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. २०२१ पर्यंत अमरावती जिल्ह्यात ८ लाख ३७ हजार ७७३ वाहने होती. यामध्ये प्रामुख्याने दुचाकी ६,८७,७७८, चारचाकी मध्यम वाहने ६८,१०, ऑटोरिक्षा २०३५९ व ट्रान्सपोर्ट वाहने ५२,९४७ असा समावेश होता. पाच वर्षांत
दुचाकी १,९०,०३९, मध्यम चारचाकी वाहने २८,३१५, ऑटोरिक्षा : ४,१७२,
जड वाहने ५,७०७, डिलिव्हरी व्हॅन १,२६६, ट्रॅक्टर १०,१६४, ट्रॉली १,८३०
अ‍ॅम्बुलन्स १५७, ई-रिक्षा ४७६, लक्झरी टुरिस्ट बस ३६९, टँकर २८ व
इतर १,०९१ अशी वाहनांची संख्या वाढली आहे.