आता इंटरनेटशिवायही करता येईल यूपीआय पेमेंट!

    दिनांक :14-Apr-2026
Total Views |
मुंबई
UPI payment डिजिटल व्यवहार अधिक सुलभ करण्याच्या दिशेने नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, आता इंटरनेटशिवायही UPI पेमेंट करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 99# या USSD सेवेमार्फत मोबाईल वापरकर्ते कोणत्याही डेटा किंवा वाय-फायशिवाय सुरक्षितपणे आर्थिक व्यवहार करू शकणार आहेत.

UPI payment  
सध्या गुगल पे, फोनपे, पेटीएम आणि भीम यांसारख्या अ‍ॅप्समुळे डिजिटल पेमेंट मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहे. मात्र ग्रामीण भागात किंवा नेटवर्क समस्या असलेल्या ठिकाणी इंटरनेटअभावी व्यवहार अडथळा निर्माण होतो. ही अडचण दूर करण्यासाठी NPCI ने ही ऑफलाइन UPI सेवा सुरू केली आहे, जी विशेषतः कमकुवत नेटवर्क असलेल्या भागातील वापरकर्त्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे.या सुविधेअंतर्गत वापरकर्ते आपल्या मोबाईलवरून 99# हा USSD कोड डायल करून व्यवहार करू शकतात. स्क्रीनवर येणाऱ्या पर्यायांद्वारे ‘Send Money’ निवडून, लाभार्थ्याचा मोबाईल नंबर टाकून पैसे पाठवता येतात. प्राप्तकर्त्याचे नाव दिसल्यानंतर व्यवहाराची पुष्टी करून UPI पिन टाकल्यास पेमेंट पूर्ण होते. ही संपूर्ण प्रक्रिया इंटरनेटशिवायही सुरक्षितपणे पूर्ण करता येते.NPCI ने ही सेवा यापूर्वीच सुरू केली असून, ती विशेषतः अशा भागांसाठी उपयुक्त आहे जिथे इंटरनेट कनेक्टिव्हिटी मर्यादित आहे किंवा वारंवार खंडित होते. या माध्यमातून आर्थिक व्यवहार अधिक सर्वसमावेशक आणि सुलभ करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
या सुविधेसाठी मोबाईल UPI payment  नंबर बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे तसेच UPI पिन आधीच सेट केलेला असावा. त्याचप्रमाणे संबंधित मोबाईल क्रमांकावरूनच *99# डायल करणे आवश्यक आहे.डिजिटल व्यवहारांच्या वाढत्या वापरामुळे दैनंदिन जीवन अधिक सोपे झाले असले तरी, नेटवर्क अडचणींच्या पार्श्वभूमीवर ऑफलाइन UPI सेवा हा महत्त्वाचा पर्याय ठरत आहे. ग्रामीण तसेच दुर्गम भागातील नागरिकांसाठी ही सुविधा विशेषतः लाभदायक ठरणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.