ज्येष्ठ नागरिकांची तीर्थक्षेत्र दर्शन सहल

    दिनांक :14-Apr-2026
Total Views |
नागपूर,
senior citizens ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान, नागपूर व अमर नगर ज्येष्ठ नागरिक मंडळ, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने माहूर येथे तीर्थक्षेत्र सहलीचे आयोजन करण्यात आले. या सहलीदरम्यान ज्येष्ठ नागरिकांनी माहूर येथील रेणुका माता, दत्तशिखर आणि अनुसया माता मंदिरात दर्शन घेतले. ही सहल प्रतिष्ठानचे सचिव राजूजी मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मंडळाचे अध्यक्ष देविदास आगरकर यांच्या प्रयत्नाने यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आली. या सहलीत एकूण ३४ सभासदांनी सहभाग घेतला.

senior citizens
 
सहलीच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे उपाध्यक्ष गणपतराव निंबाळकर, अशोक सांभारे, राजेश्वर डगरवार, रामदास माहुरे, शोभा आगरकर, दत्तात्रय उदापुरे, केशवराव कोहाड, गोपाळ सोरते, सरिता धनजोड, किरण ठाकरे, senior citizens शीला इझनकर, जया रासेकर, रेखा काठीकर, ॲड. शरद अरमरकर, सिंधू तुमसरे, मालती गौरखेडे, ज्योती ढोले, रेखा बोबडे, लता असोले, भाऊदास नागपुरे, जयश्री उदापुरे, मीना वर्मा व माधुरी सोरते यांनी अथक परिश्रम घेतले.
सौजन्य: उज्वल रोकडे, संपर्क मित्र