प्रगती वाचनालयात महामानवांच्या पुस्तकाचे ग्रंथ प्रदर्शन व चर्चा

    दिनांक :14-Apr-2026
Total Views |
बुलढाणा, 
Pragati Library ग्रंथ हा माझा श्वास आहे ग्रंथाचे वाचन जो करेल त्याच्यामध्ये सामाजिक राजकीय व सांस्कृतिक भान आल्याशिवाय राहत नाही व्यवस्था परिवर्तन करायचे असेल तर वाचनाशिवाय दुसरा पर्याय नाही असे बाबासाहेब नेहमी म्हणायचे त्याचेच अनुकरण करून गेल्या अनेक वर्षापासून प्रगती वाचनालयात १४ एप्रिल डॉटर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी दर्जेदार पुस्तकांचे ग्रंथ प्रदर्शन होते आणि निमित्ताने निवडक ग्रंथावर स्थानिक लेखक व ग्रंथालयाचे चोखंदळवाचक यांच्यामध्ये चर्चा केली जाते यावर्षी ग्रंथालयाने आपल्या वाचकांसाठी नुकत्याच खरेदी केलेल्या निवडक पुस्तकांचे ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात आले ग्रंथ या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून करण्यात आले.
 
 
pragati
 
Pragati Library  यावेळी ज्येष्ठ समीक्षक डॉ.एस. एम. कानडजे, साहित्यिक सुरेश साबळे, रविकिरण टाकळकर, प्रा. विनोद देशमुख, प्रा डॉ. संतोष आंबेकर, पुरुषोत्तम गणगे, डॉ.विजया काकडे, शाहीना पठान, प्रगती वाचनालयाचे ग्रंथपाल तथा सीटूचे जिल्हा अध्यक्ष कॉ. पंजाबराव गायकवाड, सरला इंगळे, गजानन आंभोरे, संजय जैन इत्यादी सह बहुसंख्येने ग्रंथ प्रेमी चोखंदळ वाचक उपस्थित होते. या ग्रंथ प्रदर्शनात बुद्ध, कबीर, संत तुकारामा पासून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी, म.फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, कार्ल मार्स, अण्णाभाऊ साठे, क्रांतिसिंह नाना पाटील, पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी इत्यादी महामानवाच्या चरित्रात्मक पुस्तकावर गंभीरपणे चर्चा करून महामानवाच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. उन्हाळी सुट्टीचा उपक्रम म्हणून या वर्षी प्रगती वाचनालयाच्या वतीने बुलडाणा शहरातील लहान मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून अभिरूची संपन्न विशेष बालसाहित्याची पुस्तक खरेदी केली आहे.बुलडाणा शहरातील बालवाचकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रगती वाचनालयाच्यावतीने करण्यात आले आहे.