वर्धा,
Praveen Togadia देशात मुस्लिमांची संख्या वाढत चालली आहे. त्यातच लव्ह जिहादच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ होताना दिसून येत आहे. हा चिंतेचा विषय आहे. ‘हिंदू घटता रहेगा तो घरघर मे काटा जाएगा’ असे सांगत सरकारने मुस्लिमांसाठी जनसंख्या नियंत्रण कायदा आणावा, अशी मागणी आंतरराष्ट्रीय विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय बजरंग दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी केली.
मंगळवार १४ रोजी ते वर्धेत आले असता विजय राठी यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रपरिषदेत बोलत होते. यावेळी राष्ट्रीय बजरंग दलाचे विदर्भ प्रांत अध्यक्ष अनुप जयस्वाल उपस्थित होते.
डॉ. तोगडिया पुढे म्हणाले की, देशभरात १ लाख ठिकाणी हनुमान चालीसा पठन अभियान चालविले जात आहेत. या अभियानाच्या माध्यमातून दररोज प्रत्येक हिंदूंनी हनुमान चालीसा पठन स्थळी मुठभर धान्य जमा करावे. ते गरीब हिंदूंना मोफत वाटप केले जाईल. यासोबतच रोगमुत हिंदू कुटुंबांसाठी प्रशिक्षणासह शिबिराचे आयोजनही केले जाणार आहे. वर्धेत १७ ठिकाणी हनुमान चालीसा पठन सुरू असून ‘हिंदू घर, स्वस्थ घर, रोगमुत घर’ करण्याचा संकल्प असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
राज्यात जनावरांच्या Praveen Togadia चार्याचा प्रश्न बिकट आहे. त्यामुळे हा प्रश्न राज्य सरकारने सोडवावा. यासाठी दुसर्या राज्यातून चार्याची व्यवस्था करण्याची गरज त्यांनी व्यत केली. शेतकर्यांना उत्पादित शेतमाल, दूध, भाजीपाला यासह फळांच्या मालाला योग्य दर मिळत नाही. उत्पादक शेतकर्यांना कमी दर तर खरेदीदारांना जास्त दर मिळत असल्याने हा पैसा जातो कुठे, असा प्रश्न उपस्थित करीत सरकारने याबाबतची जबाबदारी उचलावी, अशी अपेक्षाही व्यत केली. जिल्ह्यातील २० गावांमध्ये पाण्याची भीषण टंचाई असून शेतकर्यांना शेती कसण्यासाठी मोठी पायपीट करावी लागते, या प्रश्नावर उत्तर देताना सरकारसोबत चर्चा करणार असल्याचे डॉ. तोगडिया यांनी सांगितले.
बांग्लादेशींना देशातून हद्दपार करावे
देशात मतदार याद्यांचे पुनर्निरीक्षण सुरू आहे. त्यामुळे मतदार यादीतून लाखो नागरिकांची नावे वगळण्यात आली आहे. घुसखोरी रोखण्यासाठी बांग्लादेशींना देशातूनच हद्दपार करावे. धर्मांतरणाचा विषय आता शेड्यूल कास्टपर्यंत मर्यादित राहिलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी जागरुक राहण्याचे आवाहनही डॉ. तोगडिया यांनी यावेळी केले. सोबतच नाशिक येथील लव्ह जिहाद आणि धर्मांतरणाचे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून दोषींना कडक शासन करावे, अशी मागणीही यावेळी त्यांनी केली.