भटक्या श्वानांचा हैदोस ६ वर्षीय बालकावर हल्ला

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

    दिनांक :14-Apr-2026
Total Views |
पुणे,
stray dog attack लोहगाव परिसरात भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे पुन्हा एकदा गंभीर घटना घडली असून, ६ वर्षीय चिमुकल्यावर कुत्र्यांच्या झुंडीने हल्ला केल्याने परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, महापालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
 

Pune stray dog attack, Lohegaon dog 
मिळालेल्या माहितीनुसार, लोहगाव येथील आठवडे बाजार परिसरात रविवारी सायंकाळी एक लहान मुलगा खेळत असताना अचानक भटक्या कुत्र्यांच्या एका झुंडीने त्याच्यावर हल्ला केला. काही क्षणांतच कुत्र्यांनी त्याला चावा घेत गंभीर जखमी केले. परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेत मुलाची सुटका केली आणि त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
 
या घटनेनंतर स्थानिक stray dog attack  रहिवाशांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. लोहगाव परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, शाळा, रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. नागरिकांनी सांगितले की, कुत्र्यांच्या झुंडी दिवसेंदिवस आक्रमक होत असून, विशेषतः लहान मुले आणि दुचाकीस्वारांना लक्ष्य केले जात आहे. रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणेही धोकादायक झाले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.स्थानिक नागरिकांनी महापालिकेकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे. भटक्या कुत्र्यांचे नियंत्रण, लसीकरण आणि आक्रमक कुत्र्यांचे त्वरित स्थलांतर करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी जोर धरत आहे. शाळा परिसर आणि गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा वाढवावी, तसेच नियमित गस्त वाढवावी, असेही नागरिकांनी स्पष्ट केले आहे.
या घटनेमुळे लोहगाव परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, पालकवर्गातही चिंता वाढली आहे. लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना न झाल्यास भविष्यात आणखी गंभीर घटना घडण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.