सेल्फी काढायला गेला अन् विहिरीत पडून जीव गेला

- सेल्फी च्या नादात विहिरीत पडून युवकाचा मृत्यू

    दिनांक :14-Apr-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,

Hingna accident सध्या जवळपास प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आल्यामुळे सेल्फी काढण्याचा माेह अनेकांना आवरत नाही. मात्र, सेल्फीच्या नादात स्वतःचा जीवसुद्धा धाेक्यात असल्याची अनेकांना जाणीव नसते. अशीच एक घटना हिंगणा परिसरात उघडकीस आली. एका युवकाने विहिरीच्या काठावर बसून सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा ताेल गेल्याने त्याचा जीव गेला. ही घटना रविवारी उघडकीस आली. अनिकेत उत्तमराव साेनटक्के (वय 18,रा. भारतमाता नगर, न्यू नरसाळा राेड, हिंगणा) असे या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे.
 

Hingna accident  
अनिकेत हा रविवारी Hingna accident  सकाळी मित्रांसाेबत माैजा वेळाहरी येथील बावडी विहिरीजवळ फिरण्यासाठी गेला हाेता. आनंदाच्या क्षणांना कॅमेèयात टिपण्याच्या उत्साहात ताे विहिरीच्या कडेला उभा राहून फाेटाे काढत हाेता. याचदरम्यान त्याची चप्पल पाण्यात पडली. ती काढण्याच्या प्रयत्नात ताेल जाऊन अनिकेत विहिरीत काेसळला. मित्रांनी आरडाओरड केली, मात्र काही क्षणांतच ताे पाण्यात बुडाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. माेठ्या प्रयत्नांनंतर अनिकेतचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. त्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी मृतदेह एम्स रुग्णालयात पाठविण्यात आला. या प्रकरणी राज गाेपाल साेनटक्के यांच्या सूचनेवरून हिंगणा पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, केवळ एका फोटाेसाठी जीव धाेक्यात घालण्याची वाढती प्रवृत्ती पुन्हा एकदा समाेर आली असून, अशा घटनांमुळे तरुणांमध्ये सुरक्षिततेबाबत जागरूकतेची गरज अधाेरेखित झाली आहे.