सिंदीरेल्वे भाजपात अचानक खांदेपालट

अमोल गवळी नवे शहराध्यक्ष

    दिनांक :14-Apr-2026
Total Views |
सिंदीरेल्वे,
Sindhi Railway सिंदीरेल्वेच्या भाजपा शहराध्यक्षपदी युवा नेते अमोल गवळी यांची निवड करण्यात आली. त्यांना जिल्हाध्यक्ष संजय गाते यांनी हिंगणघाट येथील बैठकीत नियुक्तीपत्र दिले.
 

Sindhi Railway 
भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष संजय गाते यांनी नगर पालिका निवडणुकीत अपेक्षेनुसार यश मिळाले नाही. यावर मंथन करुन हा खांदेपालट केल्याचे समजते. अमोल गवळी हे युवा कार्यकर्ता असून त्यांचा व्यापक जनसंपर्क असल्याचे निवडणुकीत जाणवले.
त्यांनी आ. समीर कुणावार, Sindhi Railway भाजपा जिल्हाध्यक्ष संजय गाते, माजी खा. रामदास तडस, नगराध्यक्ष राणी कलोडे, किशोर दिघे आदींचे आभार मानलेत.