सामाजिक समरसता गतीविधीतर्फे डॉ. आंबेडकर यांना मानवंदना

    दिनांक :14-Apr-2026
Total Views |
चंद्रपूर,
tribute to dr ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सामाजिक समरसता गतीविधीतर्फे येथील डॉ. बाबासाहेब आबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे खंड संघचालक लक्ष्मण ओलालवार, सामाजिक समरसता गतीविधीचे संयोजक डॉ. नंदकिशोर मैंदळकर व सहसंयोजक मोहन जीवतोडे उपस्थित होते.
 
 
tribute to dr ambedkar
 
तसेच वसंत थोटे, गणपत सत्रे, अशोक भालेराव, अरुण मदनकर, अ‍ॅड. आशिष धर्मपुरीवार, रामजीवन परमार, जगदीश मुडपल्लीवार, मनीष दुबे, सुधीर मिसार, विवेक आंबेकर, अ‍ॅड. नितीन गाटकीने, अ‍ॅड. आशिष मुंदडा, श्रीकांत सत्रे, अजय सज्जनवार, नगरसेवक रवी लोणकर तसेच अंचलेश्वर शाखा व श्रीराम शाखेचे मुख्य शिक्षक, कार्यवाह व सर्व स्वयंसेवक उपस्थित होते.tribute to dr ambedkar यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, डॉ. हेडगेवार सेवा समिती, भारतीय मजदूर संघ, ग्राहक मंच, बजरंग दल, वनवासी कल्याण आश्रम, धर्मजागरण, अधिवक्ता परिषद या विविध संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी उपस्थित राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पण केली.