वैदर्भीय गाडी लोहार महासंघाची विशेष आमसभा

    दिनांक :14-Apr-2026
Total Views |
नागपूर,
Vaidarbhiya Carpenter Federation रविवारी वैदर्भीय गाडी लोहार व तत्सम जाती महासंघाची विशेष आमसभा झाडे सुतार भवन, जगनाडे चौक येथे उत्साहात संपन्न झाली. नियोजित वेळेनुसार सभेला सुरुवात झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे नागपूर अध्यक्ष मधुकर शेंडे होते. लोहार समाजाचे आराध्य दैवत भगवान विश्वकर्मा व ऐरण देवता यांच्या घोषणांसह पूजन करून सभेची सुरुवात करण्यात आली. मंचावर महासंघाचे माजी उपाध्यक्ष व ज्येष्ठ मार्गदर्शक पडघम साहेब तसेच संस्थापक सदस्य शिवनकर साहेब प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी महाराष्ट्रातील दिवंगत लोहार समाज बांधवांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
 
nagpur
 
यानंतर सभेच्या मुख्य विषयांना सुरुवात झाली. प्रारंभीचे संचालन महासंघाचे उपाध्यक्ष अनिलजी मेश्राम यांनी केले. मान्यवरांचे स्वागत केल्यानंतर महासंघाचे सचिव जितेश मेश्राम यांनी नियोजित विषयांवर सविस्तर माहिती देत चर्चेला प्रारंभ केला. विविध विषयांवर सभेत सखोल चर्चा करून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. Vaidarbhiya Carpenter Federation महासंघाच्या कार्याचा प्रचार-प्रसार वाढावा व संघटनेचा विस्तार व्हावा या उद्देशाने तालुका, जिल्हा व महासंघ स्तरावर विविध पदांची निर्मिती करून अनेक इच्छुक समाज बांधवांना नियुक्त्या प्रदान करण्यात आल्या.
 
सभेला सुमारे साठ समाज बांधव व पदाधिकारी उपस्थित होते. अध्यक्षांच्या परवानगीने ‘वेळेवर येणारे विषय’ या अंतर्गतही अनेक समाज बांधवांनी आपापल्या संकल्पना मांडल्या. Vaidarbhiya Carpenter Federation त्या अनुषंगाने सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. शेवटी महासंघाचे युवा अध्यक्ष उत्तम शेंडे यांनी आभार प्रदर्शन करून अध्यक्षांच्या परवानगीने सभा संपल्याचे जाहीर केले.
  
यावेळी महासंघाच्या कार्याचा विस्तार, जबाबदाऱ्या व विकेंद्रीकरण यासाठी अनेक पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. यामध्ये जेष्ठ मार्गदर्शक व सल्लागार म्हणून माधव पडघन आणि ज्ञानेश्वर डहाके, प्रसिद्धी प्रमुख म्हणून मेघश्याम दाभेकर, विदर्भ संघटक म्हणून विजय दाभेकर, भंडारा जिल्हा युवा अध्यक्ष म्हणून किशोर रामटेके, गोंदिया जिल्हा कार्यकारी अध्यक्ष म्हणून राजकुमार मेश्राम, Vaidarbhiya Carpenter Federation सल्लागार म्हणून राजपाल बावणकर, नागपूर शहर (पूर्व विभाग) अध्यक्ष म्हणून सतिश भूरे, नागपूर कार्याध्यक्ष म्हणून महादेव केळकर, चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून गजू बावणे, कोराडी सर्कल युवा अध्यक्ष म्हणून राजेश हरिहर, चंद्रपूर जिल्हा युवा अध्यक्ष म्हणून भिष्मा शेंडे, नागपूर विभाग युवा संघटक म्हणून शांतनू दाभेकर, नागपूर संघटक म्हणून श्रीराम बावणे तसेच कोराडी सर्कल प्रचारक म्हणून नरेंद्र आताग्रे यांचा समावेश आहे.
सौजन्य: उज्वल रोकडे, संपर्क मित्र