आशाताईंच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होता सुशांत सिंग?

    दिनांक :14-Apr-2026
Total Views |
मुंबई,
Sushant attends Asha's funeral आशा भोसले यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी अभिनेता विकी कौशल त्यांची नात जनाईशी बोलताना दिसत होता. याच वेळी त्यांच्या मागे उभ्या असलेल्या एका व्यक्तीकडे अनेकांचे लक्ष गेले आणि त्यावरून मोठी चर्चा सुरू झाली. काही जणांच्या मते ही व्यक्ती दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्यासारखी दिसते, असे मतही व्यक्त झाले आहे.
 
 
 

suahsnt  
एका चित्रफितीत विकी कौशल आणि जनाई यांच्यातील संभाषण दिसून येते, मात्र त्याहून अधिक चर्चा त्यांच्या मागे उभ्या असलेल्या एका व्यक्तीमुळे होत आहे. त्या व्यक्तीने पांढरा कुर्ता आणि पायजमा परिधान केला असून त्याचा चेहरा आणि ठेवण पाहून अनेकांनी तो सुशांत सिंग राजपूत यांच्यासारखा दिसतो असे म्हटले आहे. ही व्यक्ती भोसले कुटुंबातील असल्याचे सांगितले जात असून त्याच्या उपस्थितीवरून विविध चर्चा रंगल्या आहेत.