मुंबई
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च कौन्सिल इंडिया (BARC) यांनी जाहीर केलेल्या १०व्या आठवड्याच्या टीआरपी अहवालात छोट्या पडद्यावर मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. काही लोकप्रिय मालिकांनी आपले स्थान कायम राखले असताना. काही कार्यक्रमांना फटका बसला आहे . विशेष म्हणजे, दीर्घकाळ प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेने जोरदार पुनरागमन करत टॉप ५ मध्ये स्थान मिळवले आहे.
या आठवड्यात पहिल्या क्रमांकावर क्योंकि सास भी कभी बहू थी 2 ही मालिका कायम राहिली असून, तिच्या कथानकाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले आहे. दुसऱ्या स्थानावर अनुपमा ने आपली मजबूत पकड कायम ठेवली आहे. तिसऱ्या क्रमांकावर तुम से तुम तक ही मालिका राहिली आहे.
या आठवड्याचा खरा ‘गेम चेंजर’ ठरलेली ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका चौथ्या क्रमांकावर पोहोचली आहे. अलीकडील कथानक आणि वाढलेली प्रेक्षकसंख्या यामुळे या मालिकेच्या टीआरपीमध्ये लक्षणीय वाढ झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. टॉप ५ मधील पाचवे स्थान वसुधा या मालिकेला मिळाले आहे.
दरम्यान, गंगा माई की बेटियां Taarak Mehta Ka Ooltah Chashmah सहाव्या स्थानावर राहिली आहे. मात्र, दीर्घकाळ टॉपमध्ये असलेल्या ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेच्या टीआरपीमध्ये घसरण झाली असून, ती सातव्या क्रमांकावर घसरली आहे. उड़ने की आशा या मालिकेलाही घसरणीचा सामना करावा लागला असून ती आठव्या स्थानावर आली आहे.याशिवाय, जगद्धात्री या मालिकेने पहिल्यांदाच टॉप १० मध्ये स्थान मिळवत नवव्या क्रमांकावर प्रवेश केला आहे. दुसरीकडे, नागिन 7 या मालिकेला मोठा फटका बसला असून ती दहाव्या स्थानावर घसरली आहे.कलाकारांच्या लोकप्रियतेबाबतही या आठवड्यात काही रोचक बदल दिसून आले आहेत. ‘नागिन ७’ची अभिनेत्री प्रियंका चाहर चौधरी या अजूनही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय असून, त्या दुसऱ्या स्थानावर आहेत. तर ‘ये रिश्ता क्या कहलाता है’मधील समृद्धि शुक्ला या सर्वाधिक लोकप्रिय कलाकार ठरल्या आहेत. तिसऱ्या स्थानावर रोहित पुरोहित यांचे नाव आहे.
एकूणच, १०व्या आठवड्याच्या Taarak Mehta Ka Ooltah Chashmah टीआरपी अहवालातून प्रेक्षकांच्या बदलत्या आवडी-निवडींचा स्पष्ट संकेत मिळत असून, आगामी आठवड्यांमध्ये ही स्पर्धा आणखी रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.