मुंबई
Nashik TCS incident टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) नाशिक प्रकल्पातील लैंगिक छळ प्रकरणाची टाटा सन्सने गंभीर दखल घेतली आहे. या संदर्भात माध्यमांना दिलेल्या निवेदनात टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी टीसीएसच्या नाशिक शाखेतील लैंगिक छळाच्या आरोपांना ‘अत्यंत चिंताजनक आणि वेदनादायी’ म्हटले आहे.
Nashik TCS incident नाशिक येथील या बहुराष्ट्रीय कंपनीच्या कार्यालयात आठ महिला कर्मचाèयांनी त्यांचा लैंगिक छळ झाल्याचा आणि सक्तीने धर्मांतर केले गेल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाची सत्यता पडताळण्यासाठी आणि यासाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी टीसीएसच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीओओ) आरती सुब्रमण्यम यांच्या नेतृत्वाखाली सखोल चौकशी सुरू असल्याचेही चंद्रशेखरन यांनी जाहीर केले.
दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई
Nashik TCS incident टाटा समूहाच्या कर्मचाèयांकडून होणाèया कोणत्याही प्रकारच्या सक्तीच्या किंवा गैरवर्तणुकीबाबत ‘झिरो-टॉलरन्स’ धोरण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चौकशीत दोषी आढळणाèयांविरुद्ध योग्य आणि कठोर कारवाई केली जाईल आणि आवश्यकतेनुसार प्रक्रियेत सुधारणा किंवा इतर दुरुस्तीचे उपाय त्वरित लागू करून त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.