कासवाची तस्करी करणार्‍या टोळीचा पर्दाफाश

* 6 आरोपींना अटक * सावली वनविभागाची कारवाई

    दिनांक :14-Apr-2026
Total Views |
सावली,
turtle smuggling तालुक्यातील व्याहाड खुर्द उपक्षेत्र नियतक्षेत्र शिर्शी बिट चिचडोह बॅरेजवरून हरंबा गावाकडे जाणार्‍या कच्च्या रस्त्यावर रविवारी सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान कासवाची शिकार करणारी टोळी सक्रिय असल्याची गोपनीय माहिती वनविभागाला मिळाली. माहितीच्या आधारे वनविभागाने तात्काळ कारवाई करीत 6 आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींकडून 3 मोटरसायकल, 6 मोबाईल व 2 मोठे कासव जप्त करण्यात आले आहे.
 

turtle smuggling 
 
 
ही टोळी अनेक दिवसांपासून कासवाची शिकार करीत असल्याचे समोर आले आहे. रविवारी हरांबा येथील अज्ञात व्यक्तीचा कासव तस्करांसोबत सौदा झालेला होता. अंधश्रध्देतून कासवावर उपाययोजना करून जादुटोना करण्याच्या प्रयत्नात असताना वनविभागाने ही कारवाई केली. कारवाईमध्ये आरोपी गंगाधर बुरांडे (रा. जामखुर्द), मोरेश्वर देवताळे (रा. जामखुर्द), ओमदेव शिंदे (रा. गणपूर), हेमचंद शेंडे (रा. गणपुर), धवल बेलादी (रा. गणपूर), राजेंद्र दिवसे (रा. चकनवेगाव) यांना अटक केली आहे. सर्व आरोपींवर भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 9, 39,49,50 व 51 नुसार वनगुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी सहाय्यक वन संरक्षण तरसे, वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धूर्वे, व्याहाड खुर्दचे क्षेत्र सहाय्यक मारोती पूलेवाड, सावली क्षेत्र सहाय्यक नरेश शिडाम, श्रीराम आदे, वनरक्षक महादेव मुंडे, लंकेश आखाडे, सुषमा मेश्राम, प्रिया शेंडे, निलेश बोरकर, सतीश नागोसे, एकनाथ खुळे, कल्याणी पाल, आर. डांगे, रमेश बोनलवार, राजू मुरकुटे, घनशाम बनसोड आदींनी केली. पुढील तपास सुरू आहे.