जेवर,
Uma Bharti मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री उमा भारती यांची प्रकृती वृंदावनहून परतत असताना खालावली. त्यांना तातडीने जेवर येथील कैलास रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळताच अनेक भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली. आमदार संजय शर्मा, राबूपुरा नगरपंचायत अध्यक्ष शशांक सिंह यांनीही रुग्णालयात उमा भारती यांची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली.
कात्यायनी देवी मंदिरात केली प्रार्थना
उमा भारती यांनी Uma Bharti सोमवारी सकाळी वृंदावन येथील कात्यायनी देवी मंदिरात जाऊन प्रार्थना केली. तिथे त्यांनी गोसंरक्षण, राष्ट्रीय सुरक्षा आणि श्रीकृष्ण जन्मभूमी व काशी विश्वनाथ यांच्या मुक्तीसाठी देवीची प्रार्थना केली. दर्शनानंतर त्यांनी वृंदावनमधील यमुना नदीवरील अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. मंगळवारी त्या परतीच्या प्रवासावर असताना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने जेवर येथील कैलास रुग्णालयात दाखल करण्यात आले.