वणीत जिनिंग फॅक्टरीला भीषण आग

40 ते 50 लाखांचे नुकसान

    दिनांक :14-Apr-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा

वणी,
Wani cotton gin fire येथील निळापूर रोड परिसरात असलेल्या इंदिरा एक्झिम प्रा. लि. या जिनिंग फॅक्टरीमध्ये रविवार, 12 एप्रिलला सकाळी 10 च्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत जिनिंग युनिटमधील कापूस व इतर साहित्य जळून मोठे आर्थिक नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
 

Wani cotton gin fire 
मिळालेल्या माहितीनुसार, जिनिंग युनिटमधून अचानक धूर निघताना दिसल्याने कर्मचाèयांनी तत्काळ फॅक्टरी व्यवस्थापनाला माहिती दिली. त्यानंतर कारखान्यातील अग्निशामक यंत्रणा सुरू करण्यात आली. तसेच अग्निशमन विभाग व पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.
माहिती मिळताच Wani cotton gin fire  नगर परिषद अग्निशमन दलाचे वाहन तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. फॅक्टरीतील अंतर्गत अग्निशामक साधने व अग्निशमन दलाच्या मदतीने सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.प्राथमिक अंदाजानुसार, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या आगीत जिनिंगमधील कापसाचा मोठ्या प्रमाणात साठा जळून खाक झाला असून, सुमारे 40 ते 50 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती फॅक्टरी व्यवस्थापनाने दिली.दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.