वर्धा,
heatstroke दोन दिवसांपूर्वी ३८-३९ अंशावरचे तापमान अचानक सोमवारी ४३ अंशावर गेल्याने मानवासह पशू-पक्षी आणि जनावरांनाही उष्णतेचा फटका बसताना दिसून येत आहे. एप्रिल महिन्याच्या मध्यंतरीच मे महिन्याचा अनुभव नागरिकांना पहायला मिळत आहे. वर्धा शहरात दोन ठिकाणी तर वडनेर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील फुकटा शिवारातील विलास देवतळे यांच्या शेतात एक अशा वेगवेगळ्या तीन ठिकाणी तिघांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. हा मृत्यू उष्माघाताने झाल्याची शयता वर्तविण्यात आली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे.
वर्धा शहरातील जानकी मेडिकल शेजारी अज्ञात व्यती मृतावस्थेत असल्याची माहिती मिळताच शहर पोलिसांनी १३ रोजी रात्री ७ वाजताच्या सुमारास तातडीने घटनास्थळ गाठले. मृतदेह ताब्यात घेत पंचनामा करून तो उत्तरिय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला. मृत व्यती हा सुमारे ६० वर्षे वयोगटातील असून त्याची ओळख सध्या शहर पोलिसांकडून पटविली जात आहे. दुसरी घटना शहरातील आरती चौक परिसरात १३ रोजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. अज्ञात व्यतीचा मृतदेह वेल्डिंग वर्कशॉपजवळ पडून असल्याची माहिती मिळाल्यावर शहर पोलिसांनी घटनास्थळ गाठले. मृतदेह ताब्यात घेत पंचनामाअंती उत्तरिय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला. नासीर शेख सरदार (५४) रा. हसनबाग नागपूर असे मृताचे नाव असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे.
तिसरी घटना वडनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील फुकटा परिसरात १३ रोजी उघडकीस आली. विलास एकनाथ फुलझेले (५७) रा. फुकटा असे मृतकाचे नाव आहे. विलास फुलझेले यांना दारू पिण्याची सवय होती. ते फुकटा गावातील विलास देवतळे यांच्या शेतात सालगडी म्हणून काम करायचे. विलास फुलझेले हे शेतात गेले होते. सायंकाळ होऊनही परत न आल्याने शोध घेतला असता शेतातील झाडाखाली ते निपचित पडून आढळले. तातडीने वडनेर येथील शासकीय रुग्णालयात नेले असता डॉटरांनी त्यांना मृत घोषित केल्याचे पोलिसांनी सांगितले. तिघांच्या मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नसले तरी उष्माघाताने मृत्यू झाल्याची शयता वर्तविण्यात येत आहे.