व्हॉटअ‍ॅपवर महिलेविरुद्ध पोस्ट; पोलिसात तक्रार

भाजपा महिला मोर्चाचा पुढाकार

    दिनांक :14-Apr-2026
Total Views |
सेलू,
WhatsApp defamation case भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या सेलू तालुका अध्यक्षांविषयी समाज माध्यमांवर आक्षेपार्ह मजकूर टाकल्या प्रकरणी भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष वैशाली येरावार यांच्या नेतृत्वात पोलिसात तक्रार दिली आहे.
 

WhatsApp defamation case 
पोलिस निरीक्षक यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमुद केल्यानुसार, ९ रोजी ‘घोराड एक आदर्श गाव’ या व्हॅट्सअ‍ॅप ग्रुपवर चॅटिंग सुरू असताना राजेश वरटकर यांनी येथील प्रतिष्ठित महिलेविषयी पोस्ट टाकली व नवीन कामाच्या तुम्हाला शुभेच्छा अशी जितेंद्र टेकाडे यांना पोस्ट टाकण्यात आली. ही चर्चा घोराड ग्राम पंचायतचे माजी उपसरपंच रामेश्वर घंगारे यांच्या विषयी याग्रुपवर सुरू असताना महिले विषयी टाकलेली पोस्ट ही भाजपा महिला आघाडी सेलू तालुका अध्यक्ष विरोधात असल्याने वातावरण तापले होते. दरम्यान, सेलू येथील मेडिकल चौकात हाणामारी झाली. दोन्ही गटाने पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर घोराड येथील माजी सरपंच व भाजपा महिला मोर्चा सेलू तालुका अध्यक्ष ज्योती घंगारे यांनी राजेश वरटकर यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी या मागणीची तक्रार WhatsApp defamation case  पालकमंत्री पंकज भोयर, पोलिस अधीक्षक, सेलू पोलिस ठाण्यात केली आहे.
यावेळी भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्ष वैशाली येरावार, सेलू तालुका सरपंच संघटनेच्या अध्यक्ष दामिनी डेकाटे, विधानसभा प्रमुख चित्रा ठाकूर, वर्धेच्या नगरसेवक वंदना भुते, श्रेया देशमुख, आदी उपस्थित होत्या.