राघव चड्ढांवर ‘आप’चा कोप सुरूच

झेड प्लस सुरक्षा काढली

    दिनांक :15-Apr-2026
Total Views |
नवी दिल्ली
Raghav Chadha security आम आदमी पार्टीमधील अंतर्गत कलह आता प्रकर्षाने समोर आला आहे. पंजाब सरकारने राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांना देण्यात आलेली झेड प्लस श्रेणीची सुरक्षा काढून घेतली आहे.
  
raghav chhadhha
Raghav Chadha security पंजाब पोलिसांनी गेल्या आठवड्यात चड्ढा यांचे सुरक्षा कवच हटवले. पंजाबमधून राज्यसभेवर निवडून गेल्यापासून चड्ढा यांना राज्य सरकारकडून सर्वोच्च स्तराची झेड प्लस सुरक्षा पुरविण्यात आली होती.

केंद्राने दिले कवच
Raghav Chadha security पंजाबची सुरक्षा काढून घेतल्यानंतर आता त्यांना केंद्रीय सुरक्षा कवच पुरवण्यात आले आहे. जोपर्यंत औपचारिक केंद्रीय व्यवस्था निश्चित होत नाही, तोपर्यंत त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी दिल्ली पोलिसांना देण्यात आली आहे. केंद्राने स्वत:हून खासदार राघव चड्ढा यांना सुरक्षा पुरवल्याने आप नेते संतप्त असून आमच्या नेत्यांविषयी केंद्राला इतका पुळका का जाणवतो आहे, असा सवालही त्यांनी केला आहे.
Raghav Chadha security राघव चड्ढा यांना नुकतेच राज्यसभेतील आम आदमी पक्षाच्या उपनेतेपदावरून हटवण्यात आले. पक्षाकडून आपला आवाज दाबण्यात आल्याची प्रतिक्रिया चड्ढा यांनी व्यक्त केली.