आनंदाच्या क्षणांवर काळाचा घाला

*वरपित्याचा अपघाती मृत्यू

    दिनांक :15-Apr-2026
Total Views |
हिंगणघाट, 
accidental-death : मुलाच्या लग्नाची बोलणी झाली. सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. मात्र, नियतीला काही वेगळेच मान्य होते. नगर परिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी भारत चाफले (५५) यांचा वर्धा मार्गावर झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला.
 
 
JK
 
मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या मोठ्या मुलासाठी वधू शोधण्याचे काम सुरू असताना तरोडा येथील मुलगी पसंत पडली. त्यांचा १३ रोजी उत्साहात साक्षगंध आटोपलं. ५ मे रोजी विवाहाची तारीखही निश्चित करण्यात आल्याने घरात लग्नाची लगबग सुरू झाली. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण होते. दरम्यान, भारत चाफले १४ रोजी मुलाला पुण्याला जाणार्‍या गाडीत बसवून देण्यासाठी वर्धा येथे गेले होते. मुलाला सोडून दुचाकीने हिंगणघाटला परत येत असताना सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास सोनेगावजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना वर्धा येथील रुग्णालयात नेण्यात आले. डॉटरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलं, मुलगी, असा बराचमोठा आप्तपरिवार आहे.