मंगरुळनाथ,
accused akshay tayd राज्य परिवहन महामंडळातील महिला वाहकाचा विनयभंग व शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी आरोपी अक्षय तायडे रा. हिवरा लाहे ता. कारंजा जि. वाशीम यास मंगरूळनाथ येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. एच. ठोंबरे यांनी १० एप्रिल रोजी २ वर्षे सक्त मजुरी व द्रव्य दंडाची शिक्षा सुनावली.
प्राप्त माहितीनुसार २२ एप्रिल २०१४ रोजी अमरावती-कारंजा मार्गावरील एसटी बसमध्ये महिला वाहक कर्तव्यावर असताना आरोपीने तिकीटाचे पैसे देण्यास नकार दिला. त्यातून वाद निर्माण झाला. त्यानंतर बसमधून उतरताना आरोपीने महिला वाहकाचा हात पकडून तिचा विनयभंग केला तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास पूर्ण केल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. खटल्यादरम्यान सरकार पक्षातर्फे साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. फिर्यादी व बस चालक यांच्या साक्षी तसेच इतर पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवले.
न्यायालयाने आरोपीस भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ अंतर्गत दोन वर्षे सक्तमजुरी व ३ हजार रुपये दंड, तसेच कलम ३५३ अंतर्गत एक वर्ष सक्तमजुरी व १ हजार रुपये दंड शिक्षा सुनावली.accused akshay taydदोन्ही शिक्षा एकत्रित भोगावयाच्या आहेत. या खटल्यात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता राजेश एम. बेलोकर यांनी बाजू मांडली तर कोर्ट पैरवीसाठी एलएचसी सुवर्णा मनवर व एलपीसी उज्वला गवई यांनी सहाकार्य केले.