विराट बाहेर? आरसीबीच्या सामन्यापूर्वी मोठा सस्पेन्स

    दिनांक :15-Apr-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Big suspense outside Virat विराट कोहलीआजच्या सामन्यात खेळणार की विश्रांती घेणार, याबाबत सध्या मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आज पुन्हा एकदा मैदानात उतरणार असून त्यांचा सामना लखनौ सुपर जायंट्ससंघाविरुद्ध होणार आहे. हा सामना एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर सायंकाळी खेळवण्यात येणार आहे. मात्र कोहलीच्या सहभागाबाबत अनिश्चितता कायम असल्यामुळे चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे. मागील सामन्यात कोहलीने फलंदाजी करताना संयमी खेळ दाखवला होता, परंतु क्षेत्ररक्षणाच्या वेळी तो मैदानावर उतरला नव्हता. त्यामुळे त्याच्या दुखापतीबाबत शंका अधिक वाढल्या.
 
 
 
Virat
 
यापूर्वी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात त्याने चांगली खेळी केली होती, पण घोट्याला झालेल्या दुखापतीमुळे त्याला मैदान सोडावे लागले होते. ताज्या माहितीनुसार, कोहलीने संघाच्या सराव सत्रात सहभाग घेतला असून तो सहकाऱ्यांसोबत हलक्या फुलक्या वातावरणात दिसला. मात्र त्याच्या डाव्या गुडघ्यावर पट्टी बांधलेली दिसल्याने त्याची दुखापत पूर्णपणे बरी झाली आहे की नाही, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. सरावावेळी तो केन विल्यमसनसोबत संवाद साधताना दिसला, तर ऋषभ पंत यांच्यासोबतही त्याच्या गप्पा रंगल्या होत्या. आजचा सामना संघासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. कारण विजय मिळवल्यास बंगळूर संघाला गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवण्याची संधी आहे. सध्या संघाने चार पैकी तीन सामने जिंकले असून एक सामना गमावला आहे. त्यामुळे त्यांच्या खात्यात सहा गुण आहेत. आजचा सामना जिंकल्यास त्यांचे गुण आठवर पोहोचतील आणि ते अव्वल स्थानी झेप घेऊ शकतात.